शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाचा वर्धेकरांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2022 05:00 IST

बांधकाम साहित्य टाकून विविध भागांतील नाल्याच बुजविण्यात आल्याने आणि त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे सफसेल दुर्लक्ष राहिल्याने, पावसाचे पाणी नाल्यांनी न वाहून जाता, थेट नागरिकांच्या घर व व्यावसायिक प्रतिष्ठानांत शिरल्याचा आरोप नुकसानग्रस्तांकडून करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शनिवारी सकाळी ढगाळी वातावरण असतानाच, दुपारी अचानक वातावरणात बदल होत, वर्धा शहर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे दीड तास झालेल्या पावसामुळे वर्धा शहरातील छोटे, मध्यम व मोठ्या नाल्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली. अशातच काही भागांत पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रामनगर जैन मंदिर परिसर, हिंदनगर, गौरक्षण वॉर्ड, मालगुजारीपुरा, भामटीपुरा,  स्टेशनफैल, बॅचलर रोड, कृष्णनगर, पोद्दार बगीचा, म्हाडा कॉलनी आदी भागातील तब्बल ३२८ व्यक्तींच्या घर व व्यावसायिक प्रतिष्ठानांत पावसाचे पाणी शिरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. बांधकाम साहित्य टाकून विविध भागांतील नाल्याच बुजविण्यात आल्याने आणि त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे सफसेल दुर्लक्ष राहिल्याने, पावसाचे पाणी नाल्यांनी न वाहून जाता, थेट नागरिकांच्या घर व व्यावसायिक प्रतिष्ठानांत शिरल्याचा आरोप नुकसानग्रस्तांकडून करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे. 

जनजीवन विस्कळीत : अन्नधान्याची नासाडी- शनिवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहरात चांगलाच कहर केला. अशातच नगरपालिकेचा दुर्लक्षितपणाही चव्हाट्यावर आला असून अनेकांच्या घरात नालीतील पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे पालिकेने याची गंभीर दखल घेण्याची नितांत गरज आहे. शहरातील जुन्या आरटीओ कार्यालयामागील राधानगर परिसरातील रहिवासी आशा काकडे यांच्या घरात सुमारे तीन ते चार फूट पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील जीवनावश्यक साहित्याची नासाडी झाली. नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामात हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला असून याचा फटका आता सर्वसामान्यांना बसू लागल्याचे दिसून येत आहे. परिसरातील नालीची साफसफाई न केल्याने तसेच त्या नालीचा प्रवाह मोकळा न केल्याने नालीतील पावसाचे पाणी वाहून न जाता नागरिकांच्या घरात शिरत आहे. याकडे पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर