शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 06:00 IST

सावंगी-सायगव्हान मार्ग बंद असून वाघाडी नदी दुथडी भरून वाहत असल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे सांगण्यात येते. वायगाव (गोड) व लाहोरी या मार्गावरील गावाचा संपर्क तुटला आहे. शिवाय नंदोरी-चिमुर मार्गही बंद झाला आहे. अनेक मार्गच बंद राहिल्याने याचा शैक्षणिक फटका विद्यार्थ्यांना बसला.

ठळक मुद्देआष्टी-वरूड मार्गावरील वाहतूक ठप्प : समुद्रपूर तालुक्यातील तीन गावांचा संपर्क तुटला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मंगळवारी रात्री पासून थांबून-थांबून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा बुधवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागाला चांगलाच फटका सहन करावा लागला. सततच्या पावसामुळे आष्टी-वरुड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून समुद्रपूर तालुक्यातील रासा, घोणसा, पिपरी या गावांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे.सदर गावांना जोडणाऱ्या नाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. तर मंगरुळ गावात पुराचे पाणी शिरले. शिवाय सेलू शहरात ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याची कोंडी झाल्याने मुख्य चौकाला तळ्याचे स्वरूप आले होते. काही घरांमध्ये पावसाचे पाणीही शिरले. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडली. वर्धा शहरातही सुमारे तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर दाणापूर येथील गुराखी गुणवंत घसाड (५८) हा धाम नदीतून मार्ग काढत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेला. वृत्तलिहिस्तोवर शोध सुरू होता.जनजीवन विस्कळीत; शेतशिवार जलमयसमुद्रपूर - वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील खोलगट भागातील शेतशिवार जलमय झाले आहे. शिवाय मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. छोटे व मोठे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असल्याने तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे.तालुक्यात सध्या पावसाची धुवाधार बॅटींगच सुरू आहे. तीन दिवसांपासून पाऊस आपला जोर कमी-अधिक प्रमाणात कायम ठेवत असल्याने नदी व नाले दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील मंगरुळ गावात पुराचे पाणी शिरले. शिवाय पिपरी गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने रासा, घोणसा, पिपरी या गावांचा इतर गांवाशी संपर्क तुटला आहे. तर हिंगणघाट-उमरेड मार्गावरील खापरी नाल्यावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक खोळंबली आहे. तर वडगावातही पुराचे पाणी शिरले. सावंगी-सायगव्हान मार्ग बंद असून वाघाडी नदी दुथडी भरून वाहत असल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे सांगण्यात येते. वायगाव (गोड) व लाहोरी या मार्गावरील गावाचा संपर्क तुटला आहे. शिवाय नंदोरी-चिमुर मार्गही बंद झाला आहे. अनेक मार्गच बंद राहिल्याने याचा शैक्षणिक फटका विद्यार्थ्यांना बसला. तालुक्यातील नाल नाला प्रकल्प १०० टक्के भरला असून दोन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आष्टी-वरुड महामार्गावरील वाहतूक ठप्पआष्टी (शहीद) - सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. शिवाय आष्टी-वरुड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आष्टी-साहूर-वरुड राष्ट्रीय महामार्गावरील जाम नदी वरील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून तयार केलेला डायव्हर्शन यंदा तिसऱ्यांदा वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून आष्टीला येणाऱ्यांना बोरगाव-टूमणी- झाडगाव-पंचाळा-पोरगव्हाण प्रवास करावा लागला. गावामधील नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पाऊस सुरू असताना विद्युत पुरवठाही खंडीत झाल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागला. अप्पर वर्धा धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून तो मंगळवारपर्यंत ५२.४५ टक्के भरला आहे. त्याची पाणी पातळी सध्या ६२ टक्क्याने भरल्याचे सांगण्यात येते. आष्टी मार्गे लहान-आर्वी-अंतोरा-बेलोराकडे जाणारी वाहतूक पुलावरील पाण्यामुळे खोळंली आहे. तर तळेगाव-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून कुठलेही वाहन नेता येत नाही. तेथे सध्या चिखल तयार झाला आहे. सततच्या पावसामुळे कपाशी, तूर पिकाला चांगलाच फटका बसला आहे. अंतोरा, लहान आर्वी, बेलोरा, तळेगाव, भारसवाडा, साहुर, माणिकवाडा, तारासावंगा, थार, चामला, बांबर्डा, बोरखेडी या गावांमधील अनेक घरांची पडझड झाली.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर