शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कालिचरण महाराजाच्या जामिनावर सोमवारी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 18:48 IST

न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कालिचरण महाराजाच्या जामीन अर्जावर सोमवार, ७ फेब्रुवारी रोजी निर्णय घेणार असल्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देदोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण धर्मसंसदेत केले होते आक्षेपार्ह वक्तव्य

वर्धा : कालिचरण महाराजाने धर्मसंसदेत जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी वर्धा पोलिसांनी अटक केली होती. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने बुधवारी जामीन अर्जावर सुनावणी होती. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कालिचरण महाराजाच्या जामीन अर्जावर सोमवार, ७ फेब्रुवारी रोजी निर्णय घेणार असल्याचे आदेश दिले.

कालिचरण महाराजाचे वकील विशाल टिबडेवाल आणि ॲड. मोरवाल यांनी आरोपीला पोलीस विभागाने कुठलीही नोटीस बजावली नाही. त्यामुळे आरोपीची अटक ही बेकायदेशीर आहे. २५ डिसेंबर २०२१ रोजी रायपूर येथे घटना घडली आणि वर्ध्यात २९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्यात आला. वर्ध्यात अशी कुठलीच घटना घडलेली नाही. ठाणे आणि पुणे न्यायालयानेही आरोपीला जामीन मंजूर केला होता.

आध्यात्मिक व्यक्ती आरोपी असल्याने या गुन्ह्यात चुकीच्या पद्धतीने द्वेषपूर्ण सहभाग नोंदविला गेल्याने जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद केला, तर सरकार पक्षातर्फे जर आरोपीला जामीन मंजूर केला, तर फिर्यादी, साक्षीदार व पुरावे बाधित होण्याची शक्यता आहे. तसेच कालिचरण यांचे आक्षेपार्ह विधान हे धार्मिक जातीय हिंसाचाराचे होते आणि भविष्यात धार्मिक जातीय हिंसाचार होण्याची शक्यता असल्याने जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात सोमवार, ७ फेब्रुवारी रोजी निर्णय घेण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी