शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
2
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
3
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
4
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
5
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
8
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
9
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
10
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
11
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
12
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
13
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
14
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
15
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
16
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
17
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
18
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
19
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
20
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप

दणका लोकमतचा - अ‍ॅफकॉन्सच्या अधिकारी, सहकंत्राटदाराच्या जामिनावर ११ला सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 05:36 IST

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी अवैधपणे उत्खनन करीत मुरूम व मातीची चोरी केल्याची तक्रार कोझी प्रॉपर्टीज प्रा. लि. यांनी सेलू पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

वर्धा : समृद्धी महामार्गाच्या कामासाठी अवैधपणे उत्खनन करीत मुरूम व मातीची चोरी केल्याची तक्रार कोझी प्रॉपर्टीज प्रा. लि. यांनी सेलू पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी वर्धा जिल्हा सत्र न्यायालयात अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर्सचे व्यवस्थापक अनिल कुमार बच्चूसिंग आणि उपकंत्राटदार एम. पी. कन्स्ट्रक्शनचे आशिष दफ्तरी यांनी अर्ज सादर केला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार होती; पण ही सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता बुधवारी, ११ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.अ‍ॅफकॉन्सच्या अधिकाऱ्यांच्या अटकपूर्व जामिनावर यापूर्वी ३१ आॅगस्टला सुनावणी झाली होती. त्या वेळी न्या. नरेश सातपुते यांनी उपकंत्राटदार आणि आरोपी असलेल्या आशिष दफ्तरी यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणीसाठी ३ सप्टेंबरला वेळ दिला असल्याने ही दोन्ही प्रकरणे पटलावर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही दोन्ही प्रकरणे मंगळवारी न्यायालयात ठेवण्यात आली. परंतु सुनावणी झाली नाही.

विशेष म्हणजे, सेलू पोलिसांनी अनिल कुमार बच्चूसिंग आणि आशिष दफ्तरी यांना अटकपूर्व जामीन का देऊ नये, याविषयीचा अभिप्राय न्यायालयात सादर केला आहे.रस्त्यावरील खड्डे अ‍ॅफकॉन्सने मुरूम टाकून बुजविलेसमृद्धी महामार्गासाठी अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरची शेकडो अवजड वाहने सेलू-कोटंबा व धानोली मार्गावरून सतत धावत असल्याने डांबरी रस्त्यांची वाट लागली. त्यामुळे कोटंबा गावात येणारी एसटी चार-पाच दिवसांपासून बंद झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ला प्रकाशित होताच खळबळ उडाली. ‘लोकमत’ने अ‍ॅफकॉन्सला दणका देताच सोमवारी रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. कोटंबा व धानोलीच्या नागरिकांनी लोकमतचे अभिनंदन केले आहे. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गCourtन्यायालय