शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

श्रवणच्या उपचाराकरिता शेतमजूर कुटुंब हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:24 IST

लहान आर्वी येथील दहा वर्षीय बालक श्रवण घनश्याम गायकी याला हातामधील हाडाचा कॅन्सर झाला आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने कुटुंबाने शेतमजुरी करून उपचारासाठी खर्च केला.

ठळक मुद्देदहाव्या वर्षी हाडाचा कॅन्सर : उपचारासाठी ५ लाखांचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : लहान आर्वी येथील दहा वर्षीय बालक श्रवण घनश्याम गायकी याला हातामधील हाडाचा कॅन्सर झाला आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने कुटुंबाने शेतमजुरी करून उपचारासाठी खर्च केला. मात्र डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी तब्बल पाच लाख रुपये खर्च सांगितल्याने त्याच्या आईवडिलासह गावकरी हतबल झाले आहे.देवा श्रवणला लवकर बरे कर, म्हणत लहानआर्वी वासीयांनी श्रीरामाला प्रार्थना केली आहे. समाजातील दानशुर व्यक्तींनी श्रवणच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याची मागणी त्याच्या आई वडिलांनी केली आहे. लहानआर्वी येथील घनश्याम गायकी हे भूमिहीन कुटुंब, शेतमजुरी करून ते, पत्नी, मुलगा व मुलगी असा संसार चालवित होते. मुल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. अत्यल्प मजुरी या परिवाराच्या दोन वेळची भुक भागविण्याकरिता पुरेसी ठरत होती. सर्व सुरळीत असताना घनश्याम यांचा मुलगा श्रवण अचानक हाताच्या दुखण्याने रडू लागला. त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. डॉक्टरांनी मोठा आजार आहे म्हणत अमरावती नेण्याचा सल्ला दिला. तेथे पूर्ण निदान लागले. श्रवणच्या हातामधील मोठ्या हाडात कॅन्सर झाला आहे. हे ऐकूण आईवडील ढसाढसा रडत श्रवणला घेवून लहानआर्वी आपल्या घरी आले. नातलगांना सांगितले. गाकºयांसामोर आपबिती कथन केली.सर्वांच्या लाडाचा श्रवण एकाएकी अंधरुणावर खिळला, सारे गाव सुन्न झाले. सरपंच सुनील साबळे यांनी श्रवणच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. श्रवणवर नागपूर येथे शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. याकरिता पाच लाखांचा खर्च आहे. एवढी रक्कम आणायची कुठून या चिंतेने कुटुंबाला ग्रासले.गावातील काहींनी मदतीचा हात देवू केला आहे. सामाजिक कार्यकर्ते व समाजातील दानशुरांनी श्रवणच्या शस्त्रक्रियेला मदत करून हातभार लावावा, असे वडील घनश्याम यांनी आवाहन केले आहे.पहिली मदत गावकºयांनी केलीश्रवणसाठी गावकºयांनी आर्थिक मदत करून नागपूरला भरती केले. सर्व उपचार करून झाले. आता शस्त्रक्रियेशिवाय पर्यायच उरला नाही. त्यामुळे पाच लाख एवढी रक्कम उभी करण्याचे आवाहन आहे. श्रवणचा आजार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. वेळीच उपचार न मिळाल्यास काही विपरीत घडू शकते. त्यासाठीच सर्वांचा आटापिटा सुरू आहे.