शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

आरोग्य मंत्र्यांकडून ट्रामा केअर युनिटची पाहणी

By admin | Updated: March 21, 2016 01:55 IST

येथील महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिटची राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी

हिंगणघाट : येथील महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिटची राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रविवारी पाहणी केली. त्यांना या युनिटची माहिती आ. समीर कुणावार यांनी दिली. यावेळी त्यांनी इमारतीत असलेल्या त्रुटी दूर करण्याचे निर्देषही दिले. सदर युनीटचे लोकार्पण लवकरच करण्याची ग्वाही उपस्थितांना दिली.युती शासनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अपघाती रुग्णांना मदत मिळावी याकरिता नागपूर, चंद्रपूर, पांढरकवडाच्या मध्यभागी राष्ट्रीय महामार्गावरील हिंगणघाट येथे ट्रामा केअर युनीटची घोषणा केली होती. नंतर मात्र शासन बदलताच सदर युनीट पांढरकवडा येथे हलविण्यात आले. २०१० मध्ये तत्कालीन आमदार अशोक शिंदे यांनी सदर युनीट पुन्हा हिंगणघाटला खेचून आणत ६५ लक्ष रुपयांचा निधी आणला. आता ही इमारत पुर्णत्वास आली आहे. या ट्रामा केअर युनीटच्या इमारतीत तांत्रिक बाबीच्या कारणावरून आरोग्य विभागाने ही इमारत ताब्यात घेतली नाही. या युनीटच्या त्रुटीसाठी आ. समीर कुणावार यांनी पुढाकार घेत अनेक बाबींची पुर्तता केली. आता केवळ लोकार्पण सोहळा घेण्याची गरज आ. कुणावार यांनी आरोग्य मंत्री सावंत यांच्या समक्ष मांडली. यावेळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालय व नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी माजी आमदार अशोक शिंदे, किशोर कान्हेरे, विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ. रुईकर, औषधी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र खुपसरे, श्रीधर कोटकर, शंकर मोहमारे, मुन्ना त्रिवेदी, प्रकाश अनासने, बाळु वानखेडे, सतीश ढोमणे, विनोद वानखेडे आदी उपस्थित होते. यावेळी आरोग्य मंत्र्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची दशा, रुग्णव्यवस्थेची, जेवणाचे सुक्ष्म निरीक्षण केले. ट्रामा केअर युनीट मधील त्रुटी नियमित वीज पुरवण्यासाठी एक्सप्रेस फिडरची जोडणी, आकस्मिक वीज पुरवठ्यासाठी जनरेटरची व्यवस्था, शल्य गृहातील टाईल्स जोडणीची दुरुस्ती, नळजोडणी दुरुस्ती आदीबाबत लक्ष देण्याचे संबंधितांना निर्देश दिले आहे.(तालुका प्रतिनिधी)ट्रामा केअर युनिटकरिता अधिकाऱ्याची नियुक्ती ४या उपजिल्हा रुग्णालयाला आकस्मिक भेट देऊन निरीक्षण केल्यानंतर आरोग्य मंत्री सावंत यांनी ट्रामा केअर युनीटसाठी एक अस्थीरोग तज्ज्ञ, एक भुलतज्ज्ञ, दोन वैद्यकीय अधिकारी यांची स्थायी नियुक्ती त्वरीत करण्यात येणार असल्याची माहिती दिली. उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त प्रसुती तज्ज्ञ, अस्थीरोग तत्ज्ञ, बाळरोग तज्ज्ञ ही पदे स्थायी स्वरूपात भरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या रुग्णालयाची मागणी आल्यास सोनोग्राफी व एक्सरे मशीन देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. वेतनाच्या कमतरतेमुळे शासकीय रुग्णालयात सेवा देण्यास कुणी तयार नसल्याने शासकीय महाविद्यालय व विद्यार्थी संख्या वाढविल्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत आ. समीर कुणावार, किशोर दिघे, प्रा. किरण वैद्य, प्रफुल्ल बाडे, चंद्रकांत माळवे, विठ्ठल गुळधाने, आकाश पोहाणे, शंकर यंकेश्वर, अंकुश ठाकुर, कमलाकर, येसनसुरे आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.