विद्यार्थिनीचे आत्महत्या प्रकरण : आरोपी शिक्षिका फरारचवर्धा : केसरीमल कन्या शाळेतील विद्यार्थिनी निकीता अंड्रसकर हिच्या आत्महत्येप्रकरणी रामनगर पोलिसांकडून सोमवारी तिच्या वर्गमैत्रिणीचे बयाण नोदविण्यात येणार होते. शाळेला शोक सभेनंतर सुटी दिल्याने केवळ मुख्याध्यापिकेचेच बयाण नोंदविण्यात आले. येथील वुमेन्स एज्युकेशन सोसायाटी व्दारा संचालित या शाळेतील वर्गशिक्षिकेने निकीतावर वर्गमैत्रिणाचा मोबाईल चोरल्याचा आळ घेतल्याने तिने गळफास घेत आत्महत्या केली होती. तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आत्महत्येला वर्गशिक्षिका जबाबदार असल्याचे नमूद केल्याने पोलिसांनी वर्गशिक्षिका म्हणून जयश्री कोटगिरवारवर भादंविच्या ३०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही शिक्षिका अद्याप पोलिसांच्या हाती आली नसून तिचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. शिक्षिकेच्या घराला घटनेच्या दिवसापासून कुलूप असून पोलीस तिच्या शोधात आहेत. दरम्यान या शिक्षिकेडून अटकपूर्व जामीन मिळविण्याकरिता हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. मुख्याध्यापिकेने दिलेल्या बयाणात या प्रकरणाची आपल्याला पूर्वी काहीच माहिती नव्हती. घटना घडल्यानंतरच माहिती मिळाल्याचे म्हटले असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान आत्महत्येस जबाबदार असलेली शिक्षिका न्यायालयात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे तिला अटक करण्याकरिता सापळा रचला; मात्र तिथेही पोलिसांना अपयश आल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी) जामीन नाकारला ?निकीताच्या चिठ्ठीतील वर्गशिक्षिकेने न्यायालयात अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज केला. तो न्यायालयाने फेटाळल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मुख्याध्यापिकेचे बयाण नोंदविले
By admin | Updated: February 2, 2016 01:48 IST