शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

चारपदरी रस्त्याने वाढविली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 22:23 IST

नियोजन शुन्य चार पदरी रस्ता बांधकामाचा शिरपूर व सेलसूरा येथील नागरिकांना सध्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे पावसाचे पाण्याची कोंडी होत असून तेथील नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देशिरपूर व सेलसुरा गावात पावसाच्या पाण्याने कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : नियोजन शुन्य चार पदरी रस्ता बांधकामाचा शिरपूर व सेलसूरा येथील नागरिकांना सध्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे पावसाचे पाण्याची कोंडी होत असून तेथील नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे.शिरपूर व सेलसूरा येथे पावसाचे पाणी बाहेर निघण्यास मार्ग नसल्याने या गावाला तळ्याचे स्वरूप आले आहे. संततधार पावसादरम्यान पावसाच्या पाण्याची कोंडी होत अनेकाच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दिलीप बिल्डकॉन कंपनीने चार पदरी रस्त्याचे व पुलाचे बांधकामादरम्यान गावातील पाणी बाहेर निघण्यासाठी मार्ग न ठेवल्याने तसेच ग्रा.प.ची पाणी वाहून नेणारी नाली तोडल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे सरपंच रवींद्र भानारकर यांचे म्हणणे आहे.शिरपूर गावाचे पूर्वेला उंचावर चार पदरी रस्त्याचे बांधकाम, पश्चिमेला रेल्वे मार्गाचे बांधकाम तसेच दक्षिणेला खर्डा-बोपापूर मार्ग असल्याने या तिन्ही बाजूला पावसाच्या पाण्याची कोंडी झाली आहे. त्यामुळे शनिवारी झालेल्या पावसादरम्यान पावसाच्या पाण्याची कोंडी होऊन पावसाचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरले. यामुळे अनेकांच्या घरातील संसारउपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. काही घरात एक ने दीड फुटापर्यंत पाणी शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. गावाचे तुलनेत चार पदरी रस्त्याचे व रेल्वे मार्गाला बांधकाम उंचावर गेल्यामुळे तसेच याबाबत बांधकाम प्रशासनाकडे कोणतेही नियोजन नसल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सेलसुरा येथील नवीन वस्तीतही हिच परिस्थिती ओढावली आहे. दिलीप बिल्डकॉनच्या चार पदरी रस्त्याचे बांधकाम गावातील घरांच्या तुलनेत उंचावर गेल्यामुळे या गावातही पावसाच्या पाण्याची कोंडी झाली. येथील नुकसानग्रस्तांना सर्वेक्षण करून शासकीय मदत देण्याची मागणी आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग