शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

पोहण्याकरिता उतरलेला इसम बेपत्ता

By admin | Updated: May 31, 2016 01:55 IST

येथील ठाकूरदास पोद्दार यांच्या शिवबाग मंदिर परिसरातील तलावात चंदु सूर्यभान तडस याने पोहण्याकरिता उडी

हिंगणघाट : येथील ठाकूरदास पोद्दार यांच्या शिवबाग मंदिर परिसरातील तलावात चंदु सूर्यभान तडस याने पोहण्याकरिता उडी मारली. या घटनेला ३६ तास लोटूनही तो अद्याप बेपत्ताच आहे. याची माहिती पोलिसांना देण्यात आली असून त्याला शोधण्याची मोहीम राबविण्याची मागणी आहे. त्याचा या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, शास्त्री वॉर्डातील चंदु सूर्यभान तडस (४८) हा पोहण्यासाठी शिवबाग तलावावर गेला होता. रविवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान त्याने तलावात उडी मारली; परंतु नंतर तो पाण्याबाहेर आला नाही. ही बाब त्यावेळी उपस्थित काही युवकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार निलोत्पल यांनी घटनास्थळ गाठून भोई समाजाच्या काही लोकांकडून शोध घेतला. परंतु चंदु तडस गवसला नाही. रविवारी सुद्धा पोलिसांनी काही लोकांच्या माध्यमातून शोध घेतला तरीही त्याचा थांगपत्ता लागला नाही. या संदर्भात तहसीलदार दीपक करंडे यांनाही सूचना देण्यात आली. नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी सुद्धा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. परंतु अद्याप ठोस उपाय योजना करण्यात आली नाही. बेपत्ता चंदु तडस याचा शोध घेण्याची मागणी प्रकाश राऊत, मनोज रूपारेल, गजु कुबडे, तेजस तडस आदी सह नागरिकांनी केली आहे. ठाणेदार निलोत्पल जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आहेत.(तालुका प्रतिनिधी)