शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

सुगंधाची पखरण करीत तो वेचतो संसार

By admin | Updated: January 17, 2015 23:03 IST

जन्मत:च एक हात आणि एका पायाने तो अपंग. त्यामुळे बालपण सर्वांच्या उपेक्षा झेलण्यात आणि कीव करणातच गेलं. लोकांना दया वाटायची. त्याला मात्र हा प्रकार मुळातच आवडत नव्हता.

गौरव देशमुख -वायगाव (निपाणी)जन्मत:च एक हात आणि एका पायाने तो अपंग. त्यामुळे बालपण सर्वांच्या उपेक्षा झेलण्यात आणि कीव करणातच गेलं. लोकांना दया वाटायची. त्याला मात्र हा प्रकार मुळातच आवडत नव्हता. आपण नक्की काही तरी चांगलं करायच यावर ठाम विश्वास ठेवत त्याने अवघ्या दहाव्या वर्षापासून रस्तोरस्ती फिरत अगरबत्ती विकण्याचा व्यवसाय सुरू केला. आज याच व्यवसायाच्या जोरावर धर्मराज महादेव वाघमारे हे इतरांच्या आयुष्यात सुगंधाची पखरण करीत आहे. अपंग असतानाही स्वत:च्या जिद्दीवर धर्मराजने अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय करीत ग्रंथपालाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर नोकरीसाठी कित्येक ठिकाणी जोडे झिजवले. पण पदरी निराशाच पडली. त्यामुळे नोकरीला रामराम ठोकत हक्काचा पुन्हा अगरबत्ती विक्रीचाच व्यवसाय सुरू करीत त्यातच यशस्वी होण्याचा चंग बांधला. मुळातच मनमिळावू स्वभाव असल्याने हा व्यवसाय करताना आलेल्या अडचणींवर मात करणे धर्मराजला सहज शक्य झाले. आज ते सांगतात की सुरुवातीला माणसं कीव करायची. मला मात्र हा प्रकार आवडत नव्हता. देवळी, कानगाव, अल्लीपूर, वर्धा, वायगाव या परिसरात जाऊन घरोघरी, शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालयात अगरबत्तीची विक्री करणे साधे नव्हते. सुरुवातीला बराच त्रास झाला. पण आपण इतरांच्या जीवनात सुगंध पसरवीत असल्याचं आत्मिक समाधान या व्यवसायानं दिल्याच धर्मदास सांगतात.