शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापुढे नामफलकाला दोर बांधून घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 05:00 IST

एस. कुमार कंस्ट्रक्शन, ठाणे यांच्याकडून मडावी नामक शेतकऱ्याला अंधारात ठेवून त्याच्या शेतात उत्खनन करण्यात आले. ही बाब लक्षात आल्यावर शेतातील खड्डे बुजविण्यासाठी विनंती करण्यात आली. परंतु, त्याकडे ही कंपनी दुर्लक्ष करीत आहे. शिवाय याप्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन योग्य कार्यवाहीची मागणी केली असता, त्यांच्याकडूनही कानाडोळा केला जात आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा.

ठळक मुद्देप्रहारचे आंदोलन : प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  वारंवार निवेदन देऊनही पिपरी (पारगोठान) येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासह पुनर्वसित भागातील विविध प्रश्न निकाली काढण्यात आले नसल्याचा आरोप करीत विविध समस्या तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी प्रहारच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान सूरज घायवट या आंदोलनकर्त्याने चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नामफलकाला दोराने गळफास लावून ‘मला मरायचे नाही... वाचवा’ अशी आर्त हाक दिली.एस. कुमार कंस्ट्रक्शन, ठाणे यांच्याकडून मडावी नामक शेतकऱ्याला अंधारात ठेवून त्याच्या शेतात उत्खनन करण्यात आले. ही बाब लक्षात आल्यावर शेतातील खड्डे बुजविण्यासाठी विनंती करण्यात आली. परंतु, त्याकडे ही कंपनी दुर्लक्ष करीत आहे. शिवाय याप्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन योग्य कार्यवाहीची मागणी केली असता, त्यांच्याकडूनही कानाडोळा केला जात आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा. सेलू तालुक्यातील नवरगाव पुनर्वसनमधील लाभार्थ्यांना मागील सहा वर्षांपासून लाभ देण्यात आलेला नाही. याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करून चौकशी करण्यात आली. पण प्रत्यक्षात गरजूंना लाभ देण्यात आलेला नाही. याप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. तर पिपरी पारगोठान येथील प्रकल्पग्रस्त रमेश गेटमे यांची जमीन निम्न वर्धा प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली. परंतु, त्यांना अजूनही जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला नाही. या तिन्हीप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांनी केले. आंदोलनात नावेद पठाण, प्रीतम कातकिडे, सूरज घायवट, सिराज पठाण, अमित मांडरे, शुभम भोयर, भूषण येलेकार, ऋषिकेश पाचकवडे, आशिष अंभोरे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

आंदोलनकर्त्यांची अटक व सुटका

- जिल्हा कचेरीतील आंदोलनाची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी आपल्या चमूसह आंदोलनस्थळ गाठले. शिवाय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले होते. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत शहर पोलीस स्टेशन येथे नेले. त्यानंतर या आंदोलनकर्त्यांची सुटका करण्यात आली.

अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत उडाली खळबळ- आंदोलनकर्त्यांनी दुपारी १२.०२ वाजता जिल्हाधिकारी यांचे दालन गाठून घोषणाबाजी केली. दरम्यान, एका आंदोलनकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर जिल्हाधिकाऱ्यांच्या नामफलकाला दोर बांधून गळफास घेत मला वाचवा, अशी आर्त हाक दिली. एकूणच या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

 

टॅग्स :agitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी