शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

लालपरी थांबल्याने फेरीवाले, रिक्षेवाल्यांची रोजीरोटी बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 05:00 IST

एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता २८ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. त्यानंतर काही ठिकाणी संप मागे घेऊन वाहतूक सुरू केली होती. परंतु नंतर लगेच राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या, अशी मागणी घेऊन पुन्हा संप पुकारला तो आजतागायत सुरूच आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार शासनाने वेतनवाढीची घोषणा केली पण, विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असल्याने अद्याप तोडगा निघाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा जवळपास महिन्याभरापासून संप सुरू आहे. आता हा संप मिटण्याची काही चिन्हे दिसत नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. यासोबतच बसस्थानक परिसर, स्थानकासमोर व्यवसाय करणारे फेरीवाले, पुस्तक, फळे विक्रेते यासोबतच रिक्षाचालक आदींचा व्यवसाय बुडाल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता २८ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. त्यानंतर काही ठिकाणी संप मागे घेऊन वाहतूक सुरू केली होती. परंतु नंतर लगेच राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या, अशी मागणी घेऊन पुन्हा संप पुकारला तो आजतागायत सुरूच आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार शासनाने वेतनवाढीची घोषणा केली पण, विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असल्याने अद्याप तोडगा निघाला नाही. त्यामुळे प्रवाशांसह बसस्थानकातील प्रवाशांवर अवलंबून असलेल्या लहान व्यावसायिकांचा पोटमारा होत आहे. विशेषत: विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा मार्च किंवा एप्रिलमध्ये होणार असल्याने शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. शाळांमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहे. पण, बसअभावी फरफट होत आहे. 

मुलांची दहावी, बारावीची परीक्षा तीन महिन्यावर असल्याने हे अभ्यासाचे दिवस आहे. सध्या सर्व शाळेत परीक्षा सुरू आहे. परंतु एसटी बंद असल्याने मला दररोज मुलीला दुचाकीने शाळेत सोडावे-आणावे लागते. त्यामुळे माझीही कामाचे नियोजन बिघडले आहे.- मोहन कांबळे, पालक, माठोडा बेनोडा.

मी दररोज एसटीमध्ये चढून बिस्किटे, गोळ्या, खारे दाणे विकायचो. त्यातून मिळणाऱ्या पैशावर आमचा उदरनिर्वाह चालत होता. आता एसटीचा संप सुरू असल्याने बसेस बंद आहे. त्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. - बालपांडे, नेत्रहिन फेरीवाला.

बसस्थानकाबाहेर आमचा रिक्षा उभा असतो. बसमधून येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचून दिल्यानंतर आम्हाचा पैसे मिळतात. पण, आता बसेस बंद असल्याने प्रवाशी फिरकतच नाही. त्यामुळे दिवसभर बसून राहावे लागते. आधीच कोरोनाकाळात होतं नव्हतं सारच गेलं. - देवराव, रिक्षाचालक.

आमच्या परीक्षा सुरू आहे. बसेस सुरू नाही खासगी वाहनाने यावे लागते. ते तीन पट प्रवासभाडे घेतात. आमची विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. एसटी नाही त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत येत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे.- कृतिका सुरेश खरे, विद्यार्थिनी.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप