शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

हौसेला मोल नाही; आवडीच्या नंबरसाठी मोजले 33.77 लाख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2022 22:14 IST

मागील दहा महिन्यांत हौसेला मोल नाही, असे म्हणत आपल्या आवडीच्या क्रमांकासाठी ४०९ व्यक्तींनी तब्बल ३३.७७ लाख रुपये आरटीओ कार्यालयात मोजल्याचे वास्तव आहे. व्हीआयपी क्रमांकासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नियमानुसार जादा शुल्क आकारले जाते. विशेष म्हणजे, वर्धेकरांची ३२३२ हा क्रमांक आपल्या नवीन वाहनावर असावा, अशी इच्छा राहते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा  : ‘हौसेसमोर पैसे काय चीज’ असे अनेकांकडून बोलले जाते. इतकेच नव्हे तर याबाबतची अनेक उदाहरणेही आहेत. तर आपल्या नवीन वाहनावर आपल्याच आवडीचा क्रमांक राहावा म्हणून अनेकांकडून उपप्रादेशिक परिवहन विभागात जादा शुल्कही अदा केले जाते. मागील दहा महिन्यांत हौसेला मोल नाही, असे म्हणत आपल्या आवडीच्या क्रमांकासाठी ४०९ व्यक्तींनी तब्बल ३३.७७ लाख रुपये आरटीओ कार्यालयात मोजल्याचे वास्तव आहे. व्हीआयपी क्रमांकासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नियमानुसार जादा शुल्क आकारले जाते. विशेष म्हणजे, वर्धेकरांची ३२३२ हा क्रमांक आपल्या नवीन वाहनावर असावा, अशी इच्छा राहते. काहींना संबंधित क्रमांक मिळाला असला तरी नवीन सिरीज सुरू झाल्यावर तो नंबर कुणाला गेल्यावर काहींची निराशाच होते. अशावेळी इतर दुसऱ्या व्हीआयपी क्रमांकाची निवड वाहन मालकांकडून केली जाते. त्यासाठी जादा पैसेही मोजले जातात. १० महिन्यांत ४०९ व्यक्तींनी  जादा पैसे मोजून आपल्या वाहनांसाठी व्हीआयपी क्रमांक घेतला.

सर्वाधिक भाव या नंबरला- ०००१ हा क्रमांक नवीन चारचाकी वाहनासाठी घेतल्यास नियमानुसार तब्बल तीन लाखांचे शुल्क मोजावे लागते.- ०००१ हा क्रमांक नवीन दुचाकी वाहनासाठी घेतल्यास नियमानुसार तब्बल ५० हजारचे शुल्क मोजावे लागते.

आपल्या आवडीच्या क्रमांकासाठी दुचाकीस्वारही आघाडीवर- आपल्या आवडीच्या क्रमांकासाठी केवळ चारचाकी मालकच पसंती दर्शवत नसून यात दुचाकीचालकांचा सर्वाधिक समावेश असल्याचे सांगण्यात आले.- मागील दहा महिन्यांत व्हीआयपी क्रमांक घेणाऱ्यात निम्मेहून अधिक दुचाकीस्वारच असल्याचे सांगण्यात आले.

मागील दहा महिन्यांत एकूण ४०९ व्यक्तींनी आपल्या नवीन वाहनांसाठी आपल्या आवडीच्या क्रमांकाकरिता नियमानुसारच ३३.७७ लाख मोजले आहेत. चारचाकी असो वा दुचाकीस्वारांनी आपल्या आवडीचा नंबरसाठी आमच्या कार्यालयात अर्ज केल्यावर तातडीने कार्यवाही केली जाते.- मो. समीर मो. याकूब, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस