शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पेंचची बी युक्त माती हनुमान टेकडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 22:31 IST

बघता बघता येथील वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने वृक्षारोपणाने चर्चेत आलेल्या हनुमान टेकडीवर केलेल्या वॉटर हार्वेस्टिंगला दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. हा वर्धापण दिन येथे निसर्ग प्रेमी मारुती चितमपल्ली यांच्या सानिध्यात गुरुवारी पार पडला.

ठळक मुद्देमारूती चितमपल्ली यांच्याकडून मिळाले वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बघता बघता येथील वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने वृक्षारोपणाने चर्चेत आलेल्या हनुमान टेकडीवर केलेल्या वॉटर हार्वेस्टिंगला दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. हा वर्धापण दिन येथे निसर्ग प्रेमी मारुती चितमपल्ली यांच्या सानिध्यात गुरुवारी पार पडला. यावेळी त्यांनी पेंच अभयारण्यातील बी युक्त माती टेकडीवर भेट देत त्याचे टेकडीवर रोपण केले.यावेळी मारुती चितमपल्ली यांनी टेकडीला एक खास भेट म्हणून पेंच अभयारण्यातील बी युक्त माती ज्यामध्ये वड, पिंपळ, उंबर या देशी झाडांच्या बिया मुबलक प्रमाणात आढळतात. अशी माती भेट म्हणून दिली. त्यांच्याच मार्गदर्शनात त्या मातीची कशी रोपे तयार करता येईल, या संबंधी माहिती देऊन त्याचे रोपण त्यांनी व्हीजेएमच्या सदस्यांकडून करून घेतले. यावेळी चितमपल्ली त्यांनी टेकडीवर कुठल्या प्रकारची झाडे लावायची, कुठली वृक्ष लागवड टाळायची आणि चंदनाचे रोप कसे लावायचे ते सविस्तर सांगितले. त्यांनी हनुमान टेकडीवर केलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वृक्षारोपण आणि संगोपनाची प्रशंसा केली. त्यांच्या या भेटीमुळे व्हीजेएमच्या सदस्यांना खूप ऊर्जा मिळाली. यावेळी सर्व व्हीजेएमच्या सदस्यांची उपस्थिती होती. सदस्यांनीही मारूती चितमपल्ली यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.आमदारांकडून ९० हजार रुपये देण्याची घोषणासध्या उन्हाचा तडाखा वाढत आहे. या तडाख्यात झाडांची निगा राखण्याकरिता व्हीजेएमच्या सदस्यांना मोठी मेहनत घ्यावी लागते. याककरिता व्हीजेएमचे सदस्य अजय वरटकर यांनी आ. डॉ. पंकज भोयर यांनी या प्रोजेक्टकरिता रक्कम मागितली. यावर आ. डॉ. भोयर यांनी त्यांच्या निधीतून ९० हजार रुपये या प्रकल्पाकरिता दिले आहे. यातून वृक्षसंवर्धनाला मदत होईल. आमदारांनी केलेल्या या मदतीतून टेकडी परिसरात असलेली व व्हीजेएमने लावलेली झाडे जगविण्याकरिता मोठी मदत होईल, अशा प्रतिक्रीया वैद्यकीय जनजागृती मंचच्या सदस्यांनी दिली आहे.