शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जलमय गावांसाठी सरसावले हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:57 IST

पाणी फाऊंडेशन २०१८ वॉटर कप स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सामाजिक संघटनांसह ग्रामस्थही या स्पर्धेत हिरीरीने सहभागी झाले असून सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा दिसत आहे.

ठळक मुद्देहेल्पिंग हार्टस, व्हीजेएमसह ग्रामस्थांमध्ये उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणी फाऊंडेशन २०१८ वॉटर कप स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सामाजिक संघटनांसह ग्रामस्थही या स्पर्धेत हिरीरीने सहभागी झाले असून सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा दिसत आहे. वैद्यकीय जनजागृती मंच, हेल्पिंग चॅरिटेबल ट्रस्ट यासह तब्बल ११० संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ पाणीदार गावांसाठी झटत आहेत. गाव जलमय करण्यासाठी दररोज शेकडो हात सरसावत असल्याचे दृश्यही स्पर्धेत सहभागी चार तालुक्यातील २१७ गावांत पाहावयास मिळत आहे.कारंजा तालुक्यातील भिवापूर हेटी या गावात पाण्याचा भयानक दुष्काळ आहे. यामुळे वॉटर कप स्पर्धेत गावाची निवड झाली; पण गावातील बहुतांश लोक मजूर असल्याने कुणीही श्रमदान करण्यास तयार नव्हते. अशा स्थितीत हेल्पिंग हार्टस्च्या अध्यक्ष सोनाली श्रावणे व सहकारी शीतल कुबडे यांनी पुढाकार घेत गावात सभा घेतली. सभेस पाणी फाऊंडेशन जिल्हा समन्वयक बगाडे हजर होते. पाण्याचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्यात आले. हेल्पिंग हार्टस्च्या टिमने भिवापूर हेटी या गावापासूनच श्रमदानास प्रारंभ केला. सर्व लोक मजुरी करीत असल्याने पुरूष श्रमदानास तयार होत नाही. आम्ही श्रमदान करू तर खाणार काय, असा प्रश्न त्यांना पडतो. यामुळे विशाल या प्रशिक्षणार्थी मुलाला नोकरी सोडावी लागली. त्याने हेल्पिंग हार्टसच्या मदतीने जागृती केली आणि आत गाव पाणीदार होण्यास सज्ज आहे. गावातील महिला व लहान मुले श्रमदान करताना दिसतात. भिवापूर हेटी या गावात सर्व सामाजिक संघटनांच्या मदतीची गरज आहे. या गावात श्रमदान करून गाव जलमय करावे, असे आवाहन हेल्पिंग हार्टस्च्या अध्यक्ष सोनाली श्रावणे यांनी सर्व संघटना तथा जनतेला केले आहे.आर्वी शहरात महिला शक्ती एकत्रित करण्याच्या उद्देशाने बैठक घेण्यात आली. महिलांना श्रमदानाचे तथा पाण्याचे महत्त्व विविध खेळांतून कार्यशाळा घेत समजावून सांगण्यात आली. आर्वीच्या सभेत तालुका समन्वयक भूषण कडू यांचे सहकार्य लाभले. गावात टिकास, कुदळ, फावडे यांची व्यवस्था नसल्याने काम थांबत होते; पण हेल्पिंग हार्टस्च्या टिमतर्फे कुदळ, फावडे, टोपले, टिकासचे पाच सेट गावत देण्यात आले. यामुळे कामास गती मिळाली आहे. गावात सोनाली यांच्यासह नीता जाणी, योगिता मानकर, स्मीता बढिये, कांचन धमाने, कांचन युगावकर, शीतल कुबडे, मंगला धोटे, प्रीती अहिरराव आदी श्रमदान करीत आहेत. गाव पाणीदार करण्यासाठी हवे ते प्रयत्न करू, असा संकल्पच हेल्पिंग हार्टस् चॅरिटेबल ट्रस्टने घेतला आहे.खडका गावात १५० लोकांचे श्रमदानसेलू - वॉटर कप स्पर्धेत सहभागी खडका गावात सोमवारी रात्री १२ वाजता श्रमदानास प्रारंभ करण्यात आला. व्हीजेएमचे डॉ. सचिन पावडे यांच्यासह १५० ग्रामस्थांनी खडका येथे श्रमदान केले. त्याच रात्री संजय बोबडे यांच्या शेतात ५३ घनमिटरचे वाटर बांध तयार करण्यात आले. सकाळीही जनसमुदायने मोठ्या उत्साहाने श्रमदानात सहभाग घेतला. यापूर्वी गावात शोषखड्डा, रोपवाटिका, नर्सरी ही कामे केली आहे. असे असले तरी बाहेर गावी राहणारे मित्र, नातलग यांनी सहकार्य करावे, असे आवाहन खडकाच्या ग्रामस्थांनी केली आहे.बोदड (पोड) येथे युवकांची सरशीरोहणा - सत्यमेव जयते वॉटर कप (तीन) स्पर्धेत सहभागी बोदड (पोड) येथे श्रमदानाला उत्साहाने प्रारंभ झाला. ग्रा.पं. प्रशासनाने वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचे निश्चित केल्याने गावातील युवक-युवतींनी पाणी अडवा पाणी जिरवासाठी श्रमदान करण्याची मानसिकता तयार केली आहे. स्पर्धेत पहिल्या दिवशी ४०० च्या वर ग्रामस्थांनी आर्वीचे तहसीलदार पवार यांच्या मार्गदर्शनात बोदड (पोड) येथील पठारी जमिनीवर नाली खोदकाम करून पाणी अडविण्यासाठी चर केले.