शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

स्वच्छ वर्धेसाठी सरसावले हात

By admin | Updated: April 10, 2017 01:32 IST

एकेकाळी स्वच्छ शहर, सुंदर शहराचा नारा देत सामाजिक संस्थांनी स्वच्छता अभियान राबविण्यास प्रारंभ केला होता.

नगर पालिकेचा पुढाकार : प्रभाग क्र. १८ व १९ मध्ये स्वच्छता अभियानवर्धा : एकेकाळी स्वच्छ शहर, सुंदर शहराचा नारा देत सामाजिक संस्थांनी स्वच्छता अभियान राबविण्यास प्रारंभ केला होता. हाच धागा धरत पालिका प्रशासनानेही प्रत्येक रविवारी स्वच्छ वर्धा अभियान राबविण्यास प्रारंभ केला आहे. अभियानाच्या दुसऱ्या रविवारी शहरातील दोन प्रभाग झाडून स्वच्छ करण्यात आले. यात नगर पालिकेचे पदाधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले होते.स्वच्छ वर्धा अभियानाचा दुसरा टप्पा रविवारी प्रभाग क्र. १८ आणि १९ मध्ये राबविण्यात आला. या अभियानाला प्रामुख्याने ज्येष्ठ नेत्रचिकित्सक व राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे व आ.डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. या अभियानांतर्गत दोन्ही प्रभागांमध्ये नाली, गल्ली, खुल्या जागा स्वच्छ करण्यात आल्या. कचरा गाड्यांच्या माध्यमातून दूर फेकण्यात आला. नाल्यांमध्ये निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली. प्रत्येकाच्या स्वच्छतागृहामध्ये औषधी टाकण्यात आली. शिवाय शौचालयाच्या वेंट पाईपला जाळ्या बसविण्यात आल्यात. नगर पालिका प्रशासनाच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या या अभियाना दोन्ही प्रभागांतील नागरिकांनीही सहभाग घेत स्वच्छता केली. या अभियानामुळे वर्धा शहर स्वच्छ व सुंदर करण्याकरिता खरोखरच मदत होणार असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांतून उमटत होत्या.स्वच्छ वर्धा अभियानामध्ये नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकुर, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, आरोग्य सभापती मीना भाटीया, बांधकाम सभापती निलेश किटे, महिला व बालकल्याण सभापती खॉ शबाना परवीन जहीर खॉ, कैलास राखडे, आशिफ शेख, गुंजन मिसाळ, प्रदीप ठाकरे, श्रेया देशमुख, संदीप त्रिवेदी, रंजना पट्टेवार, आशिष वैद्य, प्रतीभा बुर्ले, यशवंत झाडे, राधा चावरे, सुरेश अहुजा, अर्चना आगे, रेणुका आडे, शेख नौशाद शेख रज्जाक, वंदना भुते, वरुण पाठक यांच्यासह भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत बुर्ले, महिला शहर अध्यक्ष कमला गिरी, चेतना तायडे, हर्ष तिवारी, भाजपा व युवा मोर्चा, महिला आघाडीचे पदाधिकारी तसेच सुरेश पट्टेवार जनहित मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)