शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

अपंगांची जि.प.वर धडक

By admin | Updated: December 9, 2015 02:23 IST

प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी संघटनेने मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर आरती, धरणे आंदोलन केले.

विविध मागण्या प्रलंबित : सीईओंच्या आश्वासनानंतर आंदोलक शांतवर्धा : प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी संघटनेने मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर आरती, धरणे आंदोलन केले. अपंगांचा मोर्चा धडकताच पोलिसांनी दोन्ही गेट बंद केले. यामुळे तणाव निर्माण झाला. अखेर बाळा जगताप, हनुमंत झोटींग यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना जि.प. च्या आवारात सोडण्यात आले. यानंतर प्रथम उपमुख्य कार्यकारी अधिकारी व नंतर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी माघार घेतली नाही. सायंकाळी ५ वाजता पुन्हा सीईओ संजय मिना यांनी आंदोलकांची भेट घेत आश्वासन दिल्याने आंदोलनाची सांगता झाली.अपंगांच्या प्रलंबित मागण्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडील तीन टक्के निधीकरिता २७ फेबु्रवारी २०१५ रोजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांत जिल्हा परिषद तसेच ग्रा.पं. मधील तीन टक्के निधी, तीन टक्के घरकूल, तीन टक्के गाळे वाटप करण्यात येईल, अशी लेखी ग्वाही दिली होती. तसे न झाल्यास संबंधित ग्रा.पं.वर कार्यवाही करण्यात येईल, असेही नमूद केले होते; पण ग्रा.पं. तर दूरच जि.प. मध्ये अडकून असलेला १ कोटी ६९ लाख रुपयांचा व इतरही योजनेचा लाभ अंपगांना देण्यात आलेला नाही. यामुळे अपंगांमध्ये असंतोष होता. मंगळवारी दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेवर धडकलेल्या मोर्चाने हा संताप व्यक्त केला. आंदोलक अपंगांनी ग्रा.पं. ने किती खर्च केला, तो केला नसल्यास त्यावर काय कार्यवाही केली, आपल्या कार्यालयातून खर्च होणाऱ्या निधीचे काय झाले व संबंधितांवर काय कार्यवाही करण्यात आली, याची माहिती देण्याचा हेका धरला. मोर्चा धकडल्यानंतर प्रथम उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जि.प. समाज कल्याण अधिकारी रामटेके यांनी आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला; पण सीईओंशी बोलायचे आहे, त्यांनी आश्वासन दिले होते, अशी मागणी करण्यात आली. यानंतर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना यांच्याशी चर्चा झाली. यात १६ आणि २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेला कुठलेही अधिकार नाही. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करून त्या समितीला निर्णय घ्यावयाचा आहे, असे सांगितले; पण आंदोलक ही बाब ऐकण्यास तयार नव्हते. यावरून आंदोलकांनी पालकमंत्र्यांना बोलवा, असा हेका धरीत आंदोलन सुरू ठेवले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलक जि.प.च्या आवारात व आंदोन्लन मंडपातच होते. जि.प. सीईओ मिना यांनी पुन्हा सायंकाळी ५ वाजता आंदोलकांची भेट घेत त्यांना समजाविले. शिवाय पाठपुरावा करून समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. मोर्चा व ठिय्या आंदोलनात सुमारे २०० वर अपंग महिला-पुरूष सहभागी झाले होते.(कार्यालय प्रतिनिधी)अनुचित प्रकार टळलाजिल्हा परिषदेवर मोर्चा येत असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एम.पी. बुराडे, एएसआय गणेश इंगोले व पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना थोपविण्याचा प्रयत्न केला. यात काही काळ तणावही होता; पण सामंजस्याने घेतल्याने अनुचित प्रकार घडला नाही. भजने व धुपारणेहीमोर्चात सहभागी अपंगांनी सोबत धुपारणे, आरतीचे ताट, हार आणले होते; पण प्रथम जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने आरती केली नाही. यावेळी भजनांतून अधिकारी, पालकमंत्री यांचा उद्घोष मात्र करण्यात आला.