शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बोर व्याघ्र प्रकल्पातील गाईड संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:31 IST

बोर व्याघ्र प्रकल्पात एक गाईड पर्यटकांना घेवून संरक्षित क्षेत्रात फिरत असल्याची तक्रार वनमजुराने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे केली. या तक्रारीवरून सदर गाईडला एक महिन्याकरिता निलंबित केले. ही कारवाई कोणतीही चौकशी न करता केल्याचा आरोप करीत येथील गाईड युनियनने मंगळवारी दुपारपासून संप पुकारला.

ठळक मुद्देपर्यटकांची अडचण : एकतर्फी निर्णयाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणी : बोर व्याघ्र प्रकल्पात एक गाईड पर्यटकांना घेवून संरक्षित क्षेत्रात फिरत असल्याची तक्रार वनमजुराने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे केली. या तक्रारीवरून सदर गाईडला एक महिन्याकरिता निलंबित केले. ही कारवाई कोणतीही चौकशी न करता केल्याचा आरोप करीत येथील गाईड युनियनने मंगळवारी दुपारपासून संप पुकारला.सेलु तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात जाणाऱ्या पर्यटकांकरिता जिप्सी वाहनावर प्रशिक्षित गाईड नेणे अनिवार्य आहे. आज एका जिप्सीवर गेलेल्या निसर्ग मार्गदर्शक नत्थू सुरजुसे याने वननियमांचे उल्लंघन करीत पर्यटकांना प्रवेशबंदी क्षेत्रात नेल्याची तक्रार एका स्थायी वनमजुराने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली.शिवाय गाईडला हटकले असता जीवे मारण्याची धकमी दिल्याचाही आरोप आहे. तर गाईड सुरजुसेच्या म्हणण्यानुसार वनमजूर नागोसे हा वनभ्रमंतीच्या वेळी मद्यपान व धुम्रपान करीत असल्याची तक्रार केला आहे. या कारणावरून त्याने वरिष्ठांकडे तक्रार केल्याचा आरोप सुरजूसे यांचा आहे. या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी तळवेकर यांनी चौकशी न करता एकतर्फी निर्णय घेतल्याचे म्हणत दुपार फेरीपासून सुरजूसेला १४ जून २०१८ च्या दुपार फेरीपर्यंत निलंबनाचे लेखी आदेश दिले.

टॅग्स :Bor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्प