शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बोरच्या सफारी झोनमध्ये पाहुण्या वाघाची एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

बोर व्याघ्र प्रकल्पात बीटीआर १ अंबिका, बीटीआर २ बाजीराव, बीटीआर ३ कॅटरिना आणि बीटीआर ४ शिवाजी नामक वयस्कर वाघ वाघिणींची नोंद घेण्यात आली होती. त्यापैकी बाजीराव या वाघाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला तर शिवाजी नामक वाघ सध्या बेपत्ता आहे. तर कॅटरिनाचा मुलगा असलेल्या युवराज हा वाघ तसेच मुलगी पिंकी नामक वाघिणीचेही वास्तव्य बोर व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात आहे.

ठळक मुद्देव्हिडीओ व्हायरल : पाहुण्याची ओळख पटविणे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अंबिका आणि कॅटरिना या वाघिणींचे वास्तव्य असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी झोनमध्ये रविवारी एका पाहुण्या वाघाने ऐन्ट्री केली. विशेष म्हणजे, हा वाघ सफारी झोनमध्ये दिसताच काहींनी त्याचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. सदर पाहूणा वाघ नेमका कोण आहे याबाबतची शहानिशा सध्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. सदर वाघ सुमारे पाच ते सहा वर्ष वयोगटातील असावा, असा अंदाजही वर्तविला जात आहे.बोर व्याघ्र प्रकल्पात बीटीआर १ अंबिका, बीटीआर २ बाजीराव, बीटीआर ३ कॅटरिना आणि बीटीआर ४ शिवाजी नामक वयस्कर वाघ वाघिणींची नोंद घेण्यात आली होती. त्यापैकी बाजीराव या वाघाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला तर शिवाजी नामक वाघ सध्या बेपत्ता आहे. तर कॅटरिनाचा मुलगा असलेल्या युवराज हा वाघ तसेच मुलगी पिंकी नामक वाघिणीचेही वास्तव्य बोर व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात आहे. असे असले तरी सध्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी झोन मध्ये एका पाहुण्या वाघाचे दर्शन रविवारी सकाळी अचानक झाल्याने तो वाघ नेमका कोणता याबाबत सध्या चर्चेला उधाण आले आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात बाजीराव नामक वाघ असेपर्यंत कुठहाली दुसरा पाहुणा वाघ या जंगलात सहज प्रवेश करीत नव्हता. इतकेच नव्हे, तर कॅटरिना ही वाघिण दुसºया वाघाला सफारी झोनपर्यंत येऊ देत नव्हती. परंतु, रविवारी सकाळी अचानक पाहुणा वाघ बोर व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी झोनमध्ये दिसल्याने वन्यप्राणी मित्रांच्या भुवया उंचावल्या आहेत.७ मिनिटात ११ कि.मी. अंतर पार करणारा ‘बाजीराव’बाजीराव या वाघाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. असे असले तरी बोर व्याघ्र प्रकल्पातील हा वाघ अवघ्या सात मिनीटात सुमारे ११ कि.मी.चे अंतर पार करायचा, असे खात्रीदायक सुत्रांनी सांगितले.यापूर्वीही झाले दर्शनज्या पाहूण्या वाघाने बोर व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी झोनपर्यंत येण्याची मजल मारली त्याच वाघाचे यापूर्वी तीन वेळा इतर ठिकाणी काहींना दर्शन झाले होते. तेव्हा तो जंगल सफारीसाठी पर्यटकांना घेऊन जाणाºया जीपला पाहून थोडा लाजत होता. परंतु, यंदा तो कुठलीही परवा न करता थेट पर्यटकांच्या जीपसमोरून मोठ्या डौलानेच मार्गक्रमण करीत असल्याचा अनुभव काहींना आला असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर खात्रीदायक सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :Bor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्पTigerवाघ