शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

पालकमंत्र्यांनी जाणले ‘लोकमत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:17 IST

जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या उद्देशाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवाद सभेचे आयोजन केले होते. या सभेत नागरिकांनी तब्बल २७५ तक्रारीतून आपल्या समस्यांना मांडल्या.

ठळक मुद्देजनसंवाद सभा : नागरिकांनी २७५ तक्रारीतून मांडल्या समस्या, पंधरा दिवसांत निपटारा करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या उद्देशाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवाद सभेचे आयोजन केले होते. या सभेत नागरिकांनी तब्बल २७५ तक्रारीतून आपल्या समस्यांना मांडल्या. बहुतांश प्रकरणाचा जागेवर निकाल लाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. पालकमंत्र्यांच्या या कार्यपद्धतीमुळे सभागृहातील विभाग प्रमुख आणि कर्मचारी घामाघूम झाले होते.स्थानिक विकास भवनात पालकमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत दुपारी १ वाजता जनसंवाद सभेला सुरुवात झाली. ही सभा सायंकाळी ५ वाजतापर्यंत चालली. कर्जमाफी झाली नाही, कृषी पंप वीज जोडणी मिळाली नाही, फेरफारसाठी ६ महिन्यांपूर्वी अर्ज देऊनही फेरफार झाले नाही, वर्ग २ च्या जमिनीचे वर्ग १ मध्ये रूपांतर झाले नाही, दारूबंदी, बोगस बियाणे, नादुरुस्त व दर्जाहीन रस्ते, बांधकाम, तसेच कामगारांची बोगस नोंदणी अशा अनेक तक्रारींचा नागरिकांनी पाढाच वाचला. ना. बावनकुळे यांनी स्वत: प्रत्येक अर्ज स्वीकारुन अर्जदाराचे समाधान केले. आलेल्या प्रत्येक अर्जावर संबंधित अधिकऱ्यांनी १५ दिवसाच्या आत कार्यवाही करून तक्रारदाराला लेखी कळवावे. एखाद्या नागरिकांचे काम नियमात बसत नसेल तर तसे सुद्धा त्याला लेखी कळवून अर्ज निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि विकास योजनांची माहिती देण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी गावात शिबिर आयोजित करावे. अधिकाºयायांनी क्षेत्रभेटी द्याव्यात आणि तिथेच लोकांच्या तक्रारी सोडवाव्यात. एकाच प्रकारच्या तक्रारी पुन्हा येऊ नयेत याची अधिकाºयांनी काळजी घ्यावी. वीज वितरण विभागाच्या सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे यापुढे वीज वितरण विभागाच्या तक्रारी येऊ नये याबाबत अधिकाºयांनी सजग रहावे, असेही सांगितले. अन्नधान्य, गॅस, आवास, वीज, ग्रामीण व नझुल क्षेत्रातील पट्टे वाटप हे प्रश्न तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी तातडीने मार्गी लावावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ आणि २ आॅगस्टला वर्धेत आहेत. त्यावेळी प्रमुख अधिकाºयांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती,कृत्रिम पावसाचे नियोजन, विकास कामे, अडलेले प्रकल्प आदींची माहिती देण्यास सांगितले. या पार्श्वभूमीवर सर्व अधिकाºयांनी मुख्यालयी राहण्याचे आदेश दिलेत. या जनसंवाद सभेला आमदार डॉ. पंकज भोयर, आ. रणजित कांबळे, आ. समीर कुणावार, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, उपवन संरक्षक सुनील शर्मा, तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.सेवाग्राम आश्रमात केली ना.बावनकुळे यांनी प्रार्थनावर्ध्यातील जनसंवाद आटोपल्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमाला भेट दिली. यावेळी आश्रमचे मंत्री मुकुंद मस्के यांनी सूतगुंड, खादीची शाल व पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रार्थना भूमीवरील सर्वधर्म प्रार्थनेत सहभागी होऊन त्यांनी प्रार्थना केली. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, माजी खा.सुरेश वाघमारे, आश्रमचे जालंधरनाथ, सिद्धेश्वर उंबरकर, विजय धुमाळे, सचित्रा झाडे, प्रभा शहाने, रुपाली उगले यांची उपस्थिती होती. या दरम्यान ना. बावनकुळे यांनी सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत बैठकही घेतली.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेSewagramसेवाग्राम