शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी बंधाऱ्याने ग्रीन झोन वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:07 IST

डोंगरमाथ्यावर वसलेल्या गावाच्या सभोवताल बारमाही पाणीटंचाई असणाऱ्या भागात जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने ३ मोठे कोल्हापुरी बंधारे बांधले आहे.

ठळक मुद्देलघुसिंचन विभागाच्या नियोजनाचा फायदा : रबी पिकांना सिंचनाचा लाभ

ऑनलाईन लोकमत आष्टी (शहीद) : डोंगरमाथ्यावर वसलेल्या गावाच्या सभोवताल बारमाही पाणीटंचाई असणाºया भागात जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने ३ मोठे कोल्हापुरी बंधारे बांधले आहे. यामुळे रेड झोन क्षेत्रातील पिकांसाठी मोठा लाभ होत असून ७५ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यास मदत झाली आहे.तालुक्यातील बांबर्डा, बोरखेडी, थार, चामला, बोटोणा या गावांना बाराही महिने पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पावसाळ्याचे पाणी संपले की सतत कृत्रीम पाणी टंचाई निर्माण होते. या भागात पशुपालन मोठ्या प्रमाणात असल्याने दूध, दही, ताक, लोणी उत्पादन जास्त आहे. शेतकऱ्यांना जोडधंदा असल्यामुळे आर्थिक लाभ होण्यास मदत होते. शेतीसाठी सिंचन व्यवस्था म्हणून विहिरी आहे; पण त्या खडकाळ भागात पाणी उपलब्ध नाही. खरीप हंगाम झाल्यावर रबीची पेरणी फार कमी होत होती. यासाठी माजी आमदार दादाराव केचे यांनी जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाकडे सतत पाठपुरावा करून कोल्हापुरी बंधारे मंजूर करून घेतले. त्याचे काम पूर्ण झाले असून पाणीसाठा संचयीत करण्यास मदत झाली आहे.थारमध्ये प्रथम क्रमांकाच्या बंधाऱ्यामध्ये ८९ टीसीएम पाणीसाठा असून २० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. थारमध्ये द्वितीय क्रमांकाच्या बंधाऱ्यात ६२ टीसीएम पाणीसाठा असून १९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. बोटोणा मध्ये ७५.६० टीसीएम पाणीसाठा असून ३४ हेक्टर क्षेत्र सिंचनखाली आले आहे. बोरखेडी मध्ये ४४ टीसीएम पाणीसाठा आहे. यामध्ये ९ हेक्टर सिंचन होणार आहे. सध्या बंधाºयाचे गेटची पूर्ण लेव्हल पाण्याने भरली आहे.या सर्व बंधाऱ्याची पाहणी कार्यकारी अभियंता एच.पी. गहलोत, उपविभागीय अभियंता डी.के. लांडगे, शाखा अभियंता, विनीत साबळे यांनी केली असून समाधान व्यक्त केले आहे. शेतकºयांसाठी या जलसाठ्याचा मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.