शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

शहरावर पसरली हिरवी सावली

By admin | Updated: May 17, 2015 02:36 IST

उन्हाची दाहकता वाढायला लागल्यापासूनच शहरासह ग्रामीण भागातही ग्रीन नेटची मागणी वाढली आहे.

वर्धा : उन्हाची दाहकता वाढायला लागल्यापासूनच शहरासह ग्रामीण भागातही ग्रीन नेटची मागणी वाढली आहे. बहुतेकांच्या घरी ग्रीन नेटचे आच्छादन दिसते. त्यामुळे शहरातील बाजार परिसरात हिरवी सावली पसरल्याचा भास होत आहे. उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी कसला तरी आडोसा असावा लागतो. यासाठी आज सर्वत्र ग्रीन नेटचा वापर होत आहे. अनेक घरांपुढे अंगण असते. या अंगणात अनेक शोभेच्या कुंड्या ठेवलेल्या असतात. या झाडांचे उन्हापासून रक्षण करण्यासाठी संपूर्ण अंगणभर ग्रीन नेटचा वापर केला जात आहे. अनेकांच्या घरी गॅलरीतून उन्हाचे झोत वाहत असतात. गॅलरीत कुलर लावूनही हवेच्या गरम झोतांनी वातावरण तितकेसे थंड होत नाही. त्यामुळे पूर्ण गॅलरीवरच ग्रीन नेट टाकून ती झाकण्याचे प्रमाणही वाढले आहे. ग्रीन नेट फुटाप्रमाणे विकत मिळते. उन्हाचे झोत कमी करण्यासाठी ती उपयुक्त ठरत असल्याने मागणी वाढली आहे.शहरात सर्वत्र व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये समोर ग्रीन नेट लावल्याचे दिसते. तसेच रस्त्याच्या कडेला मोठी छत्री लावून बसलेल्या विक्रेत्यांनीही छत्रीवर ग्रीन नेट पसरवून छत्रीच हिरवीगार केली आहे. सध्या शेतांमध्येही ग्रीन नेट शेड लावून शेती केली जात आहे. त्यामुळे ग्रीन नेटच्या मागणीत बाढ झाली आहे. तसेच दिसायलाही ते आक र्षक असल्याने फॅशन म्हणूनही त्याचा उपयोग होत आहे.(शहर प्रतिनिधी)