नो व्हेईकल डे : जिल्हाधिकारीही पोहोचले पायी वर्धा : वर्धेपाठोपाठ ‘नो व्हेईकल डे’चा देवळीतही गुरुवारी शानदार शुभारंभ झाला. येथे खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष शोभा तडस, पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह जनता कनिष्ठ महाविद्यालय व न.प. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने शहराून रॅली काढण्यात आली. या रॅलीने देवळीत जनजागृती करीत प्रत्येक गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा निर्धार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेल्या या उत्स्फूर्त रॅलीचा समारोप पालिका परिसरात झाला. अन् अधिकाऱ्यांनी गाठले पायी कार्यालय४वर्धा- वर्धेत ‘नो व्हेईकल डे’च्या दुसऱ्या गुरुवारी जिल्हाधिकारी आशुतोष सलील व अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांनी पायी जात आपले कार्यालय गाठले. ‘लोकमत’च्या ‘इनिशिएटिव्ह’ने सुरू झालेल्या या उपक्रमाचा गत गुरुवारी ला शुभारंभ झाला होता. या दिवशी शासकीय सुटी असल्याने जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यात सहभागी झाले नव्हते. गुरूवारी त्यांनी या उपक्रमात सहभाग दर्शविला. ४तत्पूर्वी सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी सलील व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह वैद्यकीय जनजागृती मंचच्या सदस्यांनी महात्मा गांधी पुतळा ते सेवाग्राम येथील बापूकुटीपर्यंत जनजागृती रॅली काढली. ही रॅली परत आल्यानंतर या अभियानाशी जोडलेल्या विविध सामाजिक संघटनांनी शहरातून जनजागृती रॅली काढली. ही रॅली महात्मा गांधी पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बजाज चौक मार्गे प्रवास करीत शिवाजी चौकात विसर्जित झाली. ४‘लोकमत’च्या या उपक्रमात सहभागी होत प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याकरिता बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सायकलने कार्यालय गाठण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार त्यांचा प्रवास सकाळी १० वाजता धुनिवालेमठ येथून सुरू झाला. त्यांनी १०.४० वाजता कार्यालय गाठले. यात येथील २५ विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. येत्या गुरूवारी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही महाविद्यालयात सायकलने जाण्याचा संकल्प सोडला आहे.सायकल रॅलीने वर्धेत जनजागृती ४नो व्हेईकल डे च्या दुसऱ्या गुरुवारी वर्धेत या अभियानात सहभागी झालेल्या सर्वच सामाजिक संघटनांच्यावतीने जनजागृती रॅली काढण्यात आली होती. यात वैद्यकीय जनजागृती मंच, निसर्ग सेवा सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, बहारचे संजय इंगळे तिगावकर, आम्ही वर्धेकरचे हरिष इथापे, युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या या रॅलीचा समारोप शिवाजी चौकात झाला.
देवळीत शानदार प्रारंभ
By admin | Updated: January 1, 2016 03:10 IST