शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अनुवाद आणि भाषा प्रशिक्षणासाठी मोठा वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

अनुवाद आणि भाषा प्रशिक्षणाकरिता येथे मोठा वाव असून यासाठी प्रशिक्षण योजना तयार केली तर देशभरातील शिक्षक, अनुवादक आणि विद्यार्थी येथे येतील. राजभाषा हिंदी करिता केंद्रीय प्रशिक्षण संस्था म्हणून विश्व विद्यालयाला मान्यता देण्याच्या दिशेने योग्य पाऊले उचलण्यात येईल, असे प्रतिपादन राष्ट्रपतीचे सचिव संजय कोठारी यांनी केले.

ठळक मुद्देसंजय कोठारी : विद्यार्थी, शिक्षकांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विश्वविद्यालयात गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर विदेशी आणि भारतातील अधिकाऱ्यांकरिता अभ्यासक्रम तयार केला पाहिजे, जेणेकरून गांधीजींचे ग्राम स्वावलंबन आणि स्वयंपूर्ण खेडी असे विचार प्रसारित केले जातील. अनुवाद आणि भाषा प्रशिक्षणाकरिता येथे मोठा वाव असून यासाठी प्रशिक्षण योजना तयार केली तर देशभरातील शिक्षक, अनुवादक आणि विद्यार्थी येथे येतील. राजभाषा हिंदी करिता केंद्रीय प्रशिक्षण संस्था म्हणून विश्व विद्यालयाला मान्यता देण्याच्या दिशेने योग्य पाऊले उचलण्यात येईल, असे प्रतिपादन राष्ट्रपतीचे सचिव संजय कोठारी यांनी केले.महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाला त्यांनी रविवारी भेट दिली. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधताना ते बोलत होते.प्रो. रजनीशकुमार शुक्ल यांनी कोठारी यांचे चरखा, पुष्पगुच्छ, विश्वविद्यालयाची पुस्तके, सूतमाळा प्रदान करुन स्वागत केले. विश्वविद्यालयात त्यांनी गांधी हिलवर गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी विद्याथ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि सुविधांवर प्रश्न विचारले. कोठारीे म्हणाले, राष्ट्रपतीजींच्या अधीन देशभरातील १५० केंद्रीय विद्यापीठे आणि संस्था येतात. त्यांचे सामान्य अवलोकन करण्यासाठी वर्धा विश्वविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठांमध्ये नावीन्यपूर्ण काय करता येईल हे पाहण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांची स्पष्ट केले. हिंदी विश्व विद्यालयापासून त्याचा प्रारंभ होत आहे असेही ते म्हणाले. १९७८ बॅचचे व हरियाणा कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले कोठारी यांनी विविध सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम याविषयी विस्ताराने चर्चा केली. विश्वविद्यालयांनी माजी विद्यार्थी संघ बळकट करून त्यांचा लाभ करून घ्यावा व त्यांना आपणही काही देणे लागतो याविषयी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी समस्या व सुविधा याविषयी विचारलेल्या प्रश्नांविषयी थेट संवाद साधला. कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल, प्र-कुलगुरू प्रो. चंद्र्रकांत रागीट, प्रो. हनुमान प्रसाद शुक्ल, प्रो. मनोज कुमार, कुलसचिव कादर नवाज खान यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता प्रो. अवधेशकुमार यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन प्रकुलगुरु प्रो. हनुमानप्रसाद शुक्ल यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यांनी उन्नत भारत अभियाना अंतर्गत नांदोरा, गणेशपूर, सोनेगाव बाई, तळेगाव टालाटुले आणि तामसवाडा येथील नागरिक आणि शेतकरी यांच्याशीही चर्चा केली. स्वच्छ भारत अभियान, महिला सक्षमीकरण, ग्राम स्वावलंबन, आरोग्य सोयी, महिला बचत समूह याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. उन्नत भारत अभियानाअंतर्गत या गावांमध्ये विश्वविद्यालय काम करीत आहे. त्यांनी स्वामी सहजानंद सरस्वती संग्रहालयाचेही निरीक्षण केले. त्यांनी सेवाग्राम आणि पवनार आश्रमाला भेट देऊन तेथील महात्म्य जाणून घेतले. बापू कुटीमध्ये सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानाचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू आणि पवनार आश्रमात गौतम बजाज यांनी त्यांना आश्रमांविषयी माहिती दिली. कोठारी यांच्यासमवेत त्यांची पत्नी व मुलगीही होत्या.

टॅग्स :Socialसामाजिक