शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

पवनारात भीषण आग; दोन कुटुंबांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:51 IST

येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील हेमराज हिवरे व दौलतराव हिवरे यांच्या घराला गुरुवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग सकाळी शिकवणी वर्गाला जाण्याकरिता उठलेल्या विद्यार्थ्याला दिसली.

ठळक मुद्देजिल्ह्यात आगीच्या तीन घटना : विद्यार्थ्याच्या सतर्कतेने घटना झाली उघड

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील हेमराज हिवरे व दौलतराव हिवरे यांच्या घराला गुरुवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग सकाळी शिकवणी वर्गाला जाण्याकरिता उठलेल्या विद्यार्थ्याला दिसली. त्या मुलाने दोन्ही कुटुंबातील सदस्यांना आवाज दिल्याने ते जागे व हा प्रकार लक्षात आला. अन्यथा या आगीत कुटूंबातील सदस्यांचा होरपळून मृत्यू होण्याची शक्यता अधिक होती, असे गावकरी सांगत आहेत.या आगीत हेमराज हिवरे यांच्या घरातील ७० क्विंटल कापूस जळून खाक झाला. तर उर्वरित कापूस पाण्यामुळे ओला होऊन खराब झाला आहे. इमारतीत असलेले सागवान लाकुड, शेतीसाहित्य, इमारतीचे फाटे सुद्धा जळून खाक झाले असून बºयाच घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरात असलेले गॅस सिलिंडर वेळीच हटविल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.आगीचे वृत्त गावात पसरताच ग्रा.पं.च्या वतीने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. बुधवार कोरडा दिवस असल्यामुळे बºयाच जणांकडे पाण्याचा साठा नव्हता, पाणीपुरवठा कर्मचारी सुरेश उमाटे याने लगेच पुरवठा सुरू करून ती अडचणही दूर केली. ग्रा.पं.चे सरपंच अजय गांडोळे, पं.स.सदस्य प्रमोद लाडे, माजी ग्रा. पं. सदस्य नितीन कवाडे हे आग विझेपर्यंत परिसरात ठाण मांडून बसले होते. पोलीस प्रशासनाच्यावतीने पांडे आपल्या चमुसह दाखल झाले. सेवाग्राम ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सध्या कोणावरही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. परंतु एवढ्या पहाटे कारण नसताना आग कशी लागली हे मात्र कोडेच आहे.आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. योगेश तिमांडे, किरण गोमासे, अमोल भूत, मुकूंद करमकर, अनिल तिमांडे, उमेश हजारे, सचिन कराडे, किरण गुल्हाने, सुधाकर येरुणकर, रूपेश ठाकुर, दिनेश उराडे, दिलीप रोशन रघाटाटे, बंटी पठाण, किरण हिवरे, रोमहर्ष हिवरे, अनिकेत हिवरे, हर्षल हिवरे, सुरज कळमकर, प्रज्वल हजारे, गजानन हिवरे व इतर गावातील युवकांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.शाब्बास रे पठ्ठेहिवरे यांच्या शेजारी राहणारा तेजस मुकुंद करमरकर हा १५ वर्षाचा दहावीत शिकणारा मुलगा शिकवणीला जाण्यासाठी पहाटे ४.३० वाजता उठला असता त्याला शेजारील घरातून धूर बाहेर येताना दिसला. त्याने आरडा-ओरड करून सर्वप्रथम हिवरे कुटुंबियांना जागे करून आगीची सुचना दिली. साखर झोपेत असणाऱ्या हिवरे कुटुंबियांना आग लागल्याची खबर नव्हती. तेजसमुळे दोन्ही हिवरे कुटुंबियांचे प्राण बचावले.युवाशक्तीचे अतुलनीय कार्यआग लागून रौद्ररुप धारण करीत असल्याचे दिसताच गावातील युवाशक्तीने आपल्या अतुल शौर्याचा पराक्रम दाखवित आजुबाजूच्या विहिरीवरील मोटर पंप सुरू करुन आग पसरु न देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सोबतच त्यांना महिलावर्गांनी साथ देत आग विझविली. फायर ब्रिगेडसोबत संपर्क साधण्यात बराच वेळ लागला, तोपर्यंत युवाशक्ती व महिलावर्गाने आग बºयाच प्रमाणात आटोक्यात आणून तिला पसरण्यास बचाव केला. नाहीतर या आगीच्या विळख्यात बरीच घरे येऊन मोठी दुर्घटना घडली असती.बैलजोडी वाचलीसुधाकर येरुणकर व दिनेश उराडे यांनी प्रसंगावधान राखून गोठ्याचे कुलूप तोडून आगीतून बैलजोडीला बाहेर काढल्यामुळे बैलजोडी वाचली .घरी नसल्यामुळे प्राण वाचलेदौलतराव हिवरे सपत्नीक बाहेर गावी गेले असल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्यांचे जळालेले घर बघून त्यांना बाहेर निघणे कठीण झाले असते.आगीत झालेले नुकसानया आगीत हेमराज हिवरे यांचा ४० क्विंटल कापूस, २ गव्हाचे पोते, २ ढेपीचे पोते, ४५ सागवान मयाली, स्प्रिकंलर पाईप, २ फवारणी यंत्र, शेतीसाहित्य व इमारतीच्या मयाली असे अंदाजे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले.दौलतराव हिवरे यांच्या घरात असलेली ४० ते ४५ हजार रुपयांची रोकड, साखर, तांदुळ, दाळ, गहू, तेलाचे तीन पीपे व घराचे साहित्य असे एकूण ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले.