शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
4
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
5
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
6
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
7
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
8
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
9
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
10
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
11
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
12
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
13
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
14
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
15
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
16
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
17
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
19
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
20
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार

गवळाऊ गार्इंचे संवर्धन गरजेचे

By admin | Updated: February 22, 2016 02:15 IST

वातावरणात दिवसेंदिवस होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांची दयनिय परिस्थिती आहे. यामुळे निसर्ग कोपला की शेतकरी झोपला, ....

रामदास तडस : गवळाऊ गार्इंचे विदभस्तरीय प्रदर्शनखरांगणा (मो.) : वातावरणात दिवसेंदिवस होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांची दयनिय परिस्थिती आहे. यामुळे निसर्ग कोपला की शेतकरी झोपला, अशी व्यथा मांडतानाच शेतीसोबत गवळाऊ गाईचे संगोपण व संवर्धन करावे. यातून शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होऊ शकते, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. तळेगाव (रघुजी) येथे पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित गवळाऊ गार्इंच्या विदर्भस्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटन खा. तडस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे तर अतिथी म्हणून आमदार अमर काळे, पशुसंवर्धन आयुक्त विश्वास भोसले पुणे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिणा, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. अनिल कुंभरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्यामलता अग्रवाल, समाज कल्याण सभापती वसंता पाचोडे, महिला व बालकल्याण सभापती चेतना मानमोडे, जि.प. सदस्य राणा रणनवरे, नर्मदा पुराम, जि.प. सदस्य गोपाळ कालोकार, गजानन गावंडे, आर्वी पं.स. चे उपसभापती प्रल्हाद नांदुरकर, पूर्तीचे सुधीर दिवे, सरपंच नत्थू चंदनखेडे, उपेंद्र कोठेकार, राजेश बकाणे, बाबासाहेब इंगळे, बाबासाहेब गलाट, मनीष बोपटे आदी उपस्थित होते. दीप प्रज्वलन तसेच गवळाऊ कालवडीचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विभागीय आयुक्त विश्वास भोसले यांनी गोवंश हा मानवतेला आरोग्य देणारा घटक आहे. त्याचे संवर्धन करण्याकरिता प्रत्येक शेतकऱ्याला पाच जनावरांसाठी सर्व योजनांसह विमा कवच लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. पशु संवर्धनासाठी आॅनलाईन सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले. आ. काळे यांनी हेटीकुंडी येथील इंग्रज काळापासून सुरू असलेला गवळाऊ गाईचा फार्म पुनर्जिवीत करणे गरजेचे आहे. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जाईल, असे सांगितले. प्रास्ताविकातून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी हे प्रदर्शन म्हणजे गवळाऊ जनावरांचे ‘शो-रूम’ आहे. आपल्या विदर्भातील वातावरणात टिकणारी व जोडधंदा तसेच दुधाचे भरपूर उत्पन्न देणारी गाय आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने तिच्या संवर्धनाकरिता योजना तयार केल्या असून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे गोपालक व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे सांगितले.प्रदर्शनास पिपल फॉर अ‍ॅनिमलचे आशिष गोस्वामी, डॉ. अनिरूद्ध पाठक, उमाकांत फिकरीकर, गुरू, डॉ. शिंदे आदी उपस्थित होते.(वार्ताहर)प्रदर्शनात सहभागींना पुरस्कारगवळाऊ गार्इंचे चार विभाग पाडून उत्कृष्ट जनावरांचे जेनेटीक पद्धतीने विष्लेशन करून निवड करण्यात आली. त्यांना पुरस्कार देण्यात आले. यात गवळाऊ दुधाळू गाय प्रकारात प्रथम विलास बुरघाटे इठलापूर, द्वितीय राजू लाड कारंजा, तृतीय देविदास राऊत काचनूर यांना, गवळाऊ वासरे प्रकारात प्रथम आकाश सपकाळ, द्वितीय धनराज बारंगे, तृतीय दिलीप कालोकार यांना, कालवडी प्रकारात प्रथम रूपेश अरबट (हेटी) खरांगणा, द्वितीय सुनील खरांडे किन्हाळा व तृतीय नितीन निकोसे खरसखांडा यांना तर वळू (नंदी) प्रकारात प्रथम गणपत निकोसे, द्वितीय किशोर बुरंगे तर तृतीय पुरस्कार ताराचंद मसराम यांना पुरकृत करण्यात आले.