शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

खचलेल्या विहिरींना मिळणार अनुदान

By admin | Updated: July 18, 2014 00:16 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत २०१२-१३ या वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेजकऱ्यांच्या विहिरी खचल्या़ गाळ विहिरीत गेल्याने त्या बुजल्या़ यामुळे सदर विहिरीच्या दुरूस्तीची कामे

गौरव देशमुख - वायगाव (नि़)महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत २०१२-१३ या वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेजकऱ्यांच्या विहिरी खचल्या़ गाळ विहिरीत गेल्याने त्या बुजल्या़ यामुळे सदर विहिरीच्या दुरूस्तीची कामे घेण्याकरिता राज्य शासनाने सर्व विहिरींना प्रत्येकी १ लाख ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; पण ही कामे ३१ डिसेंबर २०१४ च्या अखेरपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे़राज्यात २०१२-१३ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली़ यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या बांधलेल्या विहिरी खचून इलेट्रीक पंपसेटसुद्धा विहिरीमध्ये पडलेले होते़ गाळामुळे विहिरी बुजलेल्या होत्या़ शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने शासन निर्णय घेऊन दुरूस्तीची कामे ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पूर्ण करावयाची आहेत़ त्यासाठी शासनाकडून शेतकऱ्याला महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून १ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. याकरिता शासन निर्णयानुसार राज्यात २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरींबाबत काही निकष देण्यात आले आहेत़ अशा विहिरींचा कृषी व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पंचनामा करून निश्चिती करावी तसेच बुजलेल्या विहिरींची नोंद सातबारावरून कमी करण्याबाबत महसूल व वनविभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कारवाई कराव़ खचलेल्या व बुजलेल्या विहिरींबाबत कृषी व महसूल अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे़ याबाबत विहिरीच्या दुरूस्तीचे अंदाजपत्रक तयार करून घ्यावे़ त्याची कमाल मर्यादा १ लाख ५० हजार रुपये एवढी असावी़ त्या अंदाजपत्रकासह महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेणे गरजेचे आहे़ ही कामे करताना ग्रामसभेची शिफारस व ग्रामपंचायतीची मान्यतासुद्धा घ्यावी लागणार आहे़ दुरूस्तीची कामे ग्रामपंचायतमार्फत करण्यात येणार आहेत़ विहिरींच्या दुरूस्तीची कामे करीत असताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे, स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे, जमीन सुधारण्याचे लाभार्थी इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी अधिनियमन २००६/७ लाभार्थी याचा समावेश राहणार आहे़ या योजनेमुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामात सिंचन करण्यास मदत होणार आहे़ अतिवृष्टीमुळे पिकांचे तसेच विहिरींचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे़