शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

साटोड्याच्या तत्कालीन सरपंचासह ग्रामसचिवाला अटक

By admin | Updated: September 7, 2016 01:02 IST

शहरालगत असलेल्या ११ गावातील बांधकाम प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सुरू आहे. यात एका मागाहून पदाधिकारी व अधिकारी अटक होत आहे.

११ गावांतील अनधिकृत बांधकाम प्रकरण वर्धा : शहरालगत असलेल्या ११ गावातील बांधकाम प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सुरू आहे. यात एका मागाहून पदाधिकारी व अधिकारी अटक होत आहे. यात मंगळवारी साटोडा ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच नितीन कोंबे (३५) रा. साटोडा व ग्रामसचिव प्रविण मनोहर राऊत (४२) रा. पिपरी (मेघे) या दोघांना पंचायत समिती कार्यालयातून अटक करण्यात आली आहे. या ११ गावात ग्रामसचिवांनी अनेकांना कुठलेही आदेश नसताना जुन्या तारखेत बांधकाम परवानगी दिली आहे. या संदर्भात ८ फेब्रुवारी २०१६ रोजी येथील प्रमोद मुरारका यांनी सावंगी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीत सावंगी ग्रामपंचायतीमध्ये मागील तारखेमध्ये परवानग्या देवून शासनाचा महसूल बुडविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात चौकशी करून पोलिसांनी सावंगी ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास केला. या तपासात अनेक बाबी समोर आल्याने अटकसत्र सुरू झाले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत ग्रामपंचायत सावंगी (मेघे) येथील तत्कालीन सरपंच उमेश जिंदे, ग्रा.पं. बोरगाव मेघेचे तत्कालीन ग्रामसेवक विलास रंगारी व ग्रामपंचायत सावंगी (मेघे)चे तत्कालीन ग्रामसेवक संजय मोरे व तत्कालीन ग्रामसेवक सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), सिंदी (मेघे) हरिदास रामटेकेला अटक केली होती. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांच्या मार्गदर्शनात पराग बी. पोटे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण मुंडे यांच्यासह हवालदार गिरीश कोरडे, संजय ठोंबरे, किशोर पाटील, रवी रामटेके, गजानन महाकाळकर, आशिष महेशगौरी व चालक मुकेश येल्ले यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.(प्रतिनिधी)