शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अन् जिल्हाधिकारी कार्यालयापुढे भरली महाविकास आघाडीची ग्रामसभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 16:01 IST

आंदोलनातून वेधले लक्ष: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील मागील तीन वर्षापासून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही. केवळ आरक्षणाची न्यायालयीन बाब पुढे करून सर्वत्र प्रशासकांच्या मार्फत शासन प्रशासन चालवण्याचं काम राज्य सरकार व स्थानिक महायुतीचे आमदार करीत आहे. विकासाची कामे मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींमार्फत योग्य वेळात, योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे होती, ती तशीच प्रलंबित आहे. यावर तोडगा काढावा या मागणीसाठी यासाठी महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स व अन्य घटक पक्षाच्या वतीने स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ग्रामसभा आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले

जिल्ह्यातील ३५६ ग्रामपंचायती, ८ पंचायत समित्या, ७ नगरपालिका, ३ नगरपंचायती, ५४ जिल्हा परिषद सदस्य, ११० पंचायत समिती सदस्य, आहेत. या संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे कामाचे संपूर्ण अधिकार प्रशासकाकडे नियंत्रित केलेले आहेत. 

या निवडणुका स्थगित केल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या सर्व अधिकारांचे उल्लंघन करण्याचे काम महाराष्ट्र शासन मागील तीन वर्षांपासून सातत्याने करत आहे. सामान्य लोकांची विकासाची जी कामे मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींमार्फत योग्य वेळात, योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे होती, ती तशीच प्रलंबित आहे. यावर राज्य शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशा प्रकारची मागणी यावेळी करण्यात आली. दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ग्रामसभा आंदोलन करीत राज्य शासनाला, राज्यपालाला निवडणूक व राज्य आयोगाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनात शरदचंद्र पवार गटाचे नितेश कराळे, महाविकास आघाडीचे संयोजक अविनाश काकडे, काँग्रेसचे अध्यक्ष मनोज चांदुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील राऊत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे यशवंत झाडे, डॉ. अभ्युदय मेघे, शेखर शेंडे, डॉ. सचिन पावडे, इंजि. तुषार उमाळे, शिवसेनेचे निहाल पांडे, सुधीर पांगुळ, अतुल वांदिले, सुदाम पवार, सुनील कोल्हे, श्रीकांत बाराहाते, बाबू टोणपे, सुरेश ठाकरे, आपचे प्रमोद बोंबले, अनिल जवादे, काँग्रेसचे शैलेश अग्रवाल, शुभम नागपुरे, सह अन्यची उपस्थिती होती. 

प्रशासक राज अन् मनमानी कारभार...महाराष्ट्रात ६०० च्या वर लोकसंख्या असणाऱ्या२८,८१३ ग्रामपंचायती, ३१५ पंचायत समिती, ३४ जिल्हा परिषद येतात. यापैकी १८ हजारच्यावर ग्रामपं चायती, २५० च्यावर पंचायत समिती व जवळपास २९ जिल्हा परिषदांच्या निवडणुका मागील ३ वर्षांपासून प्रलंबित आहे. या संस्थांवर सध्या प्रशासकाचे राज असून या ठिकाणी मनमानी कारभार सुरु आहे.

देशाची वाटचाल नोकरशाहीकडे? राज्यघटनेत ७३ व्या व ७४ व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना संवैधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे. या संस्थांचा पाच वर्षाच्या कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे. परंतु अजूनपर्यंत निवडणुका झालेल्या नाही. यावरून भारताची वाटचाल लोकशाहीकडून नोकर- शाहीकडे होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 

टॅग्स :wardha-acवर्धा