शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामासाठी ग्रामपंचायतींना मिळणार २५ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 19:18 IST

Vardha : सात ग्रामपंचायतींना इमारतीची गरज मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेची पडली भर

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पंचायत राज व्यवस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ग्रामीण भागातील गावपातळीवर विकासाच्या दृष्टीने काम करणारी महत्त्वात्ची संस्था म्हणून ग्रामपंचायतींना विशेष महत्त्व आहे. गावांचा विकास आणि ग्रामस्थांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे या विकासात्मक कामाला चालना देण्याकरिता ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत असणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता गावात चांगले ग्रामपंचायत भवन उभे राहावे, याकरिता शासनाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत २५ लाखांपर्यंत निधी देण्याची तरतूद केली आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये एकणू १३८६ गावे असून या गावांचा विकास करण्याची जबाबदारी एकूण ५२१ ग्रामपंचायतींची आहेत. जिल्ह्यात ५२१ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामविकास साधला जात आहे. यापैकी सात ग्रामपंचायतींना ग्रामपंचायतीची प्रशस्त इमारत नसून त्यांच्याकडून निधीची मागणी करण्यात आली आहे. विशेषत: ग्रामपंचायतींकडे इमारत असून ती जीर्ण झाली आहे किंवा वाढत्या लोकसंख्येमुळे त्या इमारतीतून काम करण्यास ती अपुरी पडत असल्याने नवीन ग्रामपंचायत भवनाची मागणी केली जात आहे. या शासनाकडून निधी प्राप्त होताच या ग्रामपंचायतींच्या इमारतीही साकार होणार आहे. शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्वी १५ ते २० लाखांचाच निधी उपलब्ध होत होता. मात्र, आता बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत २५ लाखांपर्यंत निधी देण्याची तरतूद असल्याने या निधीतून सुसज्ज अशी इमारत साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

२५ लाखापर्यंत इमारतींसाठी निधी ग्रामपंचायतींना शासनाच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत २५ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामाकरिता मिळतो. ज्या गावांची लोकसंख्या २ हजारांवर आहे, त्यांच्याकरिता हा निधी असून, २ हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या गावातील ग्रामपंचायतीकरिता २० लाख रुपये दिले जातात. जिल्ह्यात वर्धा तालुक्यातील सालोड (हिरापूर) व आर्वी तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण ५२१ ग्रामपंचायती असून यापैकी सात ग्रामपंचायतींकडे सुसज्ज इमारत नसल्याची माहिती उपलब्ध आहे. शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत भवनाकरिता निधी उपलब्ध करून दिला जातो. आता बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत २५ लाखांपर्यंत निधी उपलब्ध होत असून, त्याला गावाच्या लोकसंख्येची अट घातली आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच राहिलेल्या ग्रामपंचायतींना इमारत बांधकामाकरिता निधी दिला जाईल.- डॉ. ज्ञानदा फणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग, जि.प. वर्धा.

कोणत्या ग्रामपंयातींना नाही इमारतजिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये एकूण ५२१ ग्रामपंचायती असून, यापैकी दहा ग्रामपंचा यतींना ग्रामपंचायत भवन नव्हते. नुकताच आष्टी तालुक्यातील परसोडा आणि समुद्रपूर तालुक्यातील लसनपूर व लाहोरी येथील ग्रामपंचायतींना भवन मिळाले आहे. आता देवळी तालुक्यातील कोळोणा (चोरे), खातखेडा, आर्वी तालुक्यातील वाढोणा (ठाकरे) व पिपरी पुनर्वसन, आष्टी तालुक्यातील खडका, कारंजा तालुक्यातील मेठहिरजी व समुद्रपूर तालुक्यातील कवठा या सात गावांमध्ये ग्रामपंचायत भवनाची आवश्यकता आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwardha-acवर्धा