तळेगाव (श्या.पंत.) : तालुक्यात महसूल देण्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीचे वेध लागले आहे. १७ सदस्य संख्या असलेली ही ग्रामपंचायत वर्षाकाठी रोख १५ लाखांच्या आसपास कर गोळा करत आहे. यामध्ये सि.डेट कंपनी, कुकट पालन, बसस्टँड, विद्युत वितरण कंपनी, जिनिंग पे्रसींग दोन स्ट्रोन क्रेशर अशा उद्योगातून ग्रामपंचायतला लाखो रुपयांचा कर मिळतो.चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. तर सत्तेत येण्याकरिता विविध राजकीय पक्ष मोर्चेबांधणीच्या कामाला लागले आहेत. निवडणुकीसाठी जातप्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आल्याने जात पडताळणीसाठी तहसील कार्यालयात इच्छूकांची गर्दी होत आहे. तळेगाव ग्रामपंचायतीच्य एकूण सहा वॉर्डमधील जातीनिहाय, आरक्षण तहसील कार्यालयाने जाहीर केले. यामध्ये वॉर्ड क्रमांक १ मध्ये सदस्य संख्या तीन आहे. यात ओबीसी महिला किंवा पुरूष एक, ओबीसी महिला एक व खुल्या प्रवर्गातील महिलेकरिता एक जागा आरक्षित केली आहे.वॉर्ड क्र. २ मध्ये सदस्य संख्या दोन ठेवण्यात खुला प्रवर्ग पुरूष, महिला एक जागा सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित आहे. वॉर्ड क्रमांक तीनमध्ये दोन जागा खुला प्रवर्ग पुरूष, महिला, तर एक जागा खुल्या प्रवर्गातील महिलेकरिता राखीव आहे. वॉर्ड क्र. ४ मध्ये इतर मागासप्रवर्ग एक, सर्वसाधारण एक पुरूष,महिला व सर्वसाधारण महिला एक, अशा तीन जागा आरक्षित आहेत. वॉर्ड क्र.५ मध्ये अनुजमाती पुरूष, महिला एक, मागास प्रवर्ग महिला एक व सर्वसाधारण महिला एक तर वॉर्ड नं. ६ मध्ये सर्वसाधारण महिला एक़ मागास प्रवर्ग महिला एक व अनुसूचित जाती पुरूष, महिलेकरिता एक जागा आरक्षित आहे. १७ जागांपैकी नऊ जागा महिलांकरिता आहे.(वार्ताहर)
ग्रामपंचायतींना लागले निवडणुकीचे वेध
By admin | Updated: January 27, 2015 23:38 IST