शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

ग्राम पंचायत निवडणूक; वर्धा जिल्ह्यात ४.८१ लाख मतदार बजावणार हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 16:25 IST

वर्धा जिल्ह्यातील २९४ ग्रा.पं.तील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठीच्या निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणून रविवार २४ मार्चला प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

ठळक मुद्दे१०३३ मतदान केंद्रे२९४ ग्रा.पं.ची निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यातील २९४ ग्रा.पं.तील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठीच्या निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणून रविवार २४ मार्चला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठीची पूर्व तयारी जिल्हा प्रशासनाकडून झाली असून १ हजार ३३ मतदान केंद्रांवरून ही मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. रविवारी या मतदान केंद्रांवरून एकूण ४ लाख ८१ हजार ८१५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.सर्वात जास्त ग्रा.पं.ची निवडणूक होऊ घातलेला वर्धा हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. इतकेच नव्हे तर त्याच अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात ग्रा.पं.च्या निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यानंतर अर्ज भरण्याच्या दिवशीपासून अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत घडलेल्या घडामोडीदरम्यान जिल्ह्यातील चार ग्रा.पं.तील निवडणूक अविरोध झाली. त्यामुळे आता जिल्ह्यातील २९४ ग्रा.पं.ची निवडणुकीचा एक भाग म्हणून १,०३३ मतदान केंद्रांवरून प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यानंतर आता रविवारी हे प्रत्यक्ष मतदान होणार आहे. जिल्ह्यातील काही मतदान केंद्र संवेदनशील असल्याने तेथे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडवी यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्तही लावण्यात आला आहे.चार ठिकाणी झाली अविरोध निवडवर्धा जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातल्यानंतर वेळोवेळी घडलेल्या घरामोडीनंतर चार ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध झाली. यात वर्धा तालुक्यातील उमरी (मेघे), देवळी तालुक्यातील बाभुळगाव (बोबडे), कारंजा (घा.) तालुक्यातील धावसा (बु.) आणि किन्हाळा या ग्रा.पं.चा समावेश आहे.४, १३२ कर्मचारी जुंपले१,०३३ मतदान केंद्राच्या माध्यमातून सदर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकूण ४ हजार १३२ कर्मचारी सज्ज करण्यात आले आहेत. शनिवारी जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या स्थळावरून मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून सायंकाळी उशीरापर्यंत मतदान केंद्र गाठले.१,०३३ पोलीस तैनातमतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. शिवाय जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनाही पोलीस अधीक्षकांकडून विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांकडे पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले असून तेथेही शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.सरपंचसाठी २,३२९ तर ग्रा.पं. सदस्यसाठी ४, ३७० उमेदवार निवडणूक रिंगणातविविध ग्रा.पं.च्या सरपंचपदासाठी सध्या २,३२९ उमेदवार तर ग्रा.पं. सदस्यपदासाठी ४,३७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ४ लाख ८१ हजार ८१५ मतदार २९४ सरंपच आणि १,५११ ग्रा.पं. सदस्य निवडूण देणार आहेत. सदर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १, १५१ कंट्रोल युनिट तर २,३०० बॅलेट युनिटचा वापर होणार आहे. मतदान केंद्र प्रमुख व विविध साहित्य मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी सुमारे ४२८ वाहनांचा वापर करण्यात आला. यात बहूतांश वाहन रा.प.म.ची होती.ग्रा. पं. च्या निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणून रविवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. लोकशाहीत मतदान हा महत्त्वाचा विषय असून प्रत्येक मतदाराने आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करावे. आज सकाळी काही ठिकाणी आपण प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. जास्तीत जास्त मतदारांनी शांततेत मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावावे.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी वर्धा.

टॅग्स :Electionनिवडणूक