शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

धान्य व्यापाऱ्याची हत्या?

By admin | Updated: November 29, 2014 01:55 IST

सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील धान्याचे व्यापारी सुधाकर लक्ष्मण दाते (५५) यांचा ...

हिंगणघाट : सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील धान्याचे व्यापारी सुधाकर लक्ष्मण दाते (५५) यांचा शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर नांदगाव चौकापासून ६०० मीटर अंतरावर संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असली तरी घटनास्थळाच्या अवलोकनावरुन अपघात नसून घातपाताची शक्यता असल्याचा संशय बळावला आहे. अपघात झाला असता तर मृतदेह रस्त्याच्या अगदी कडेला असता. मात्र तो रस्त्यापासून काही अंतरावरील एका झाडाजवळ पडलेला आढळला. त्यातच मृतदेहाचे अवलोकन केले असता पोटावर चाकूने भोसकल्यासारख्या जखमा होत्या. यासोबतच चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केल्यासारखे दिसून येत होते. अपघातात शक्यता चेहऱ्यावर ठेचल्यासारख्या जखमा होत नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र पोलिसांनी याप्रकरणी अपघाताची नोंद केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत मृतकाचे नातेवाईकांशी चर्चा केली असता त्यांनीही मृतदेहावरील जखमा आणि घटनास्थळाच्या अवलोकनावरुन अपघाताची शक्यता फेटाळून लावत हा घातपातच असल्याचा आरोप केला आहे. यामुळे सदर प्रकरणात पोलिसांच्या पुढील तपासावरच प्रश्नचिन्ह लागण्याची शक्यता बळावली आहे.प्राप्त माहितीनुसार, सुधाकर दाते हे शेतकऱ्यांकडून कापूस, सोयाबीन, चणा व गहू खरेदी करून ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायचे. मागील अनेक वर्षांपासून ते हा व्यापार करीत आहे. गुरुवारी ते सकाळी ७ वाजता घरून हिंगणघाटला जात असल्याचे सांगून निघून गेले. त्यानंतर दुपारी २.३० वाजताच्या सुमारास त्यांनी घरी फोन केला होता. तेव्हा त्यांनी सोरता येथून चुकारा घेऊन येत असल्याचे सांगितले. यानंतर मात्र ते घरी पोहचलेच नाही. ते घरी न पोहचल्याने घरची मंडळी चिंतेत होती. यानंतर घरच्या मंडळींचा त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. अशातच त्यांचा मृतदेह आढळल्याची वार्ता आज सकाळी घरी धडकली. माहिती मिळताच सकाळी ८ वाजताच्या सुमारास त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहचले. यावेळी पोलिसांनी मृतदेह घटनास्थळावरुन हलविला होता. नातेवाईकांनी घटनास्थळाचे अवलोकन केले असता अपघाताची शक्यता त्यांना कुठेही वाटली नाही. यानंतर मृतदेहाचे अवलोकन केले असता मृतदेहावरील जखमाही अपघात झाल्यासारख्या वाटत नव्हत्या. इतकेच नव्हे, तर घटनास्थळी रक्ताचे डागसुद्धा नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सुधाकर दाते यांची हत्या करून त्यांचा मृतदेह त्या परिसरात आणून टाकला असावा, अशी शक्यताही नातेवाईकांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली. पोलीस या प्रकरणाचा तपास कसा करतात, याकडे मृतकाच्या नातेवाईकांचे लक्ष लागून आहे. या घटनेने त्यांचा गाव असलेल्या येळाकेळी येथे शोककळा पसरली आहे.(तालुका प्रतिनिधी)