शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

ग्रा.पं. स्तरावर गैरव्यवहार खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:52 IST

ग्रामपंचायत स्तरावरील कोणतेही गैरव्यवहार खपवून घेतले जाणार नाही, अशी समज विभागाचे आ. रणजीत कांबळे यांनी पंचायत समितीच्या व जिल्ह्यातील संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिली.

ठळक मुद्देपाणी टंचाईच्या बैठकीत रणजित कांबळेंची अधिकाऱ्यांना तंबी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : ग्रामपंचायत स्तरावरील कोणतेही गैरव्यवहार खपवून घेतले जाणार नाही, अशी समज विभागाचे आ. रणजीत कांबळे यांनी पंचायत समितीच्या व जिल्ह्यातील संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिली.स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीत ते बोलत होते. मंचावर पं.स. सभापती विद्या भुजाडे, उपसभापती किशोर गव्हाळकर, जि.प. सदस्य मयुरी मसराम, पं.स. सदस्य अशोक इंगळे, शंकर उईके, कल्याणी ढोक, तहसीलदार तेजस्विनी जाधव व गटविकास अधिकारी बारापात्रे यांची उपस्थिती होती.मतदार संघातील काही गावे टंचाईग्रस्त होणार हे लक्षात घेवून अधिकाºयांनी कामाची गती वाढवावी. तसेच ग्रामपंचायतीने याबाबतचे ठराव तातडीने घेवून आतापासून नियोजन करावे, असे निर्देश आ. कांबळे यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिले.आमचे सरकार योजनेंतर्गत ग्रा.पं. स्तरावर कार्यरत आॅपरेटरच्या कार्यपद्धतीवर आ. कांबळे यांनी ताशेरे ओढत याबाबत वरिष्ठ अधिकाºयांना फैलावर घेतले. तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे ६३ ग्रा.पं. मध्ये आॅपरेटर असलेच पाहिजे. कारण प्रत्येकी साडेबारा हजार याप्रमाणे ६३ आॅपरेटरचा पगार ग्रा.पं. च्या कोषातून जात आहे. परंतु प्रत्यक्षात फक्त ३७ आॅपरेटर कार्यरत आहे. उर्वरित आॅपरेटरचे पगार कुणाच्या तरी खिश्यात जात आहे, यानंतर असे जमणार नसल्याचे ते म्हणाले.ग्रा.पं. सरपंच व पदाधिकाºयांची संबंधित पाणी पुरवठा अधिकारी दिशाभूल करतात. ग्रा.पं.कडे थकीत पाणी पुरवठ्याबाबतच्या बिलाची पुर्वसूचना न देता ६-६ महिन्याचे बील एकाचवेळेस पाठविले जाते. त्यामुळे ग्रा.पं. पदाधिकाºयांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशा अनेक तक्रारी सरपंचांनी आ. कांबळे यांच्या कानी घातल्या. बैठकीला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक तसेच पाणी पुरवठ्याचे उपविभागीय अभियंता नाथे, सहा.भूवैद्यानिक डॉ. धाराशिवकर व इतर अधिकारी तथा पदाधिकारी उपस्थित होते.काजळसरा पाणीपुरवठा विहिरीने गाठला तळकाजळसरा येथे पाणी पुरवठ्याच्या विहिरीला फक्त ४ इंच क्षारयुक्त पाणी असल्याने आजाराचे प्रमाण वाढले आहे. ३५ वर्षांपुर्वीची ही विहीर असल्याने तीचे आयुष्य संपल्याची तक्रार करण्यात आली. लोणी येथील पाणीपुरवठा योजना सन १२-१३ ची असताना अद्याप पुर्णत्वास आली नसल्याने त्यांनी रोष व्यक्त केला.

टॅग्स :Ranjit Kambleरणजित कांबळे