शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने शेतकऱ्यांशी द्रोह केला- सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 21:42 IST

वर्धा - शेतकऱ्यांच्या नावाने सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांशीच द्रोह केला असून, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सेवाग्राम येथे झालेल्या सभेत मांडली.

वर्धा - शेतकऱ्यांच्या नावाने सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांशीच द्रोह केला असून, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सेवाग्राम येथे झालेल्या सभेत मांडली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल पदयात्रा सहाव्या दिवशी सेवाग्राम चौक येथे झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या सडेतोड भाषणात खोटी आश्वासने देत हे खोटारडे सरकार आमच्या आया-बहिणींचं कुंकू पुसत आहे. यवतमाळ फवारणी करताना शेतकऱ्यांचा बळी गेला.आया-बहिणींची कुंकू पुसली जात असल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विदर्भाची भूमी सरकारवर हल्लाबोल करायला निवडली आहे.या हल्लाबोलचा समारोप १२ डिसेंबरला करून आम्ही थांबणार नाही, तर त्यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारच्याविरोधात रस्त्यावर उतरून लढा सुरूच ठेवणार आहे.सरकारचा खोटरडेपणा जनतेसमोर प्रभावीपणे मांडणार असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.यावेळी मोबाईलचे प्लॅशलाईट पेटवून भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या सभेला खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सुरेश देशमुख,माजी आमदार संदीप बजोरिया,माजी आमदार गुलाबराव गावंडे,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख, प्रवक्ते महेश तपासे आदींसह राज्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, युवती, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.