शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

निसर्गरम्य परिसरातील शासकीय विश्रामगृह धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 22:18 IST

मोठे दगड, चुना व डिंक टाकून बांधलेली ही वास्तू पाटबंधारे उपविभाग सेलू येथे उपविभागीय अधिकारी मांडले जेव्हापर्यंत कार्यरत होते तेव्हापर्यंत इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले जात होते. तेव्हा इमारत परिसरही स्वच्छ होता. बौद्ध विहाराजवळ असलेल्या इमारतीत रब्बी हंगामाबाबत   दरवर्षी  परिसरातील शेतकऱ्यांच्या   बैठका आयोजित केल्या जात असे. माजी आमदार व विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांचा पुढाकार होता.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (घोराड) : तालुक्यात असलेली वनराई व निसर्गरम्य वातावरणात असलेल्या बोरधारण येथील पाटबंधारे विभागाच्या मालकीचे विश्रामगृह धूळखात पडले असून ही इमारत पत्रकार भवनासाठी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या विश्रामगृहाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शासनाने पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. बोरधारण येथे सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाच्या वतीने तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणाच्या सान्निध्यात बांधले गेले. मात्र, आजघडीला या विश्रामगृहाची वास्तू धूळखात पडली असून यावर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. ती वास्तू आज या विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे निकामी झाली असून सभोवताली उंच झाडाझुडपांचा विळखा असून प्रवेश घेण्यासही थरकाप सुटतो.मोठे दगड, चुना व डिंक टाकून बांधलेली ही वास्तू पाटबंधारे उपविभाग सेलू येथे उपविभागीय अधिकारी मांडले जेव्हापर्यंत कार्यरत होते तेव्हापर्यंत इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले जात होते. तेव्हा इमारत परिसरही स्वच्छ होता. बौद्ध विहाराजवळ असलेल्या इमारतीत रब्बी हंगामाबाबत   दरवर्षी  परिसरातील शेतकऱ्यांच्या   बैठका आयोजित केल्या जात असे. माजी आमदार व विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांचा पुढाकार होता. यात शेतकरी बांधवांना त्यांच्या अडीअडचणींबाबत विचारणा करून ऑन द स्पॉट अधिकाऱ्याला बोलावून तक्रारीचे निवारण केले जात होते. त्यानंतर तर जेव्हा या विश्रामगृहाचे दिवस पालटले आता तेव्हा  ते भंगार अवस्थेत पडून आहे. अनेकांना तर पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येत असलेले विश्रामगृह येथे असल्याचेही आठवणीत आहे किंवा नाही, यात ही शंका वर्तविल्या जात आहेत.सध्या विभागातील कामे ठप्प असल्यामुळे कुणी अधिकारी फिरकताना किंवा कार्यालयातही दिसत नाही.  कधी काळी  सेलू पाटबंधारे उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाच शाखांत जवळपास ३०० ते ३५० कर्मचारी  कार्यरत होते. तेव्हाचे सीआरटी (कन्फर्म रेग्युलर टेम्पररी) कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर काहींचे निधनही झाले. परंतु, त्यांच्यातील एकाही वारसांना कोणत्याही कामावर घेतले नाही. तसेच  रिक्त जागेवर भरतीही करण्यात आली नाही. आज फक्त या कार्यालयातून उंटावर बसून शेळ्या हाकण्याचे काम सुरू आहे.

देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी जोरात...-    या विश्रामगृहाच्या वास्तूला एकही तडा गेलेला नसून, ती आजही डौलात उभी आहे. मात्र, देखभाल व दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागातील अधिकारी लक्ष देणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. या विभागात अधिकारी व कर्मचारी आहेत किंवा नाहीत, हा विषयच बनला आहे. सेलू व हिंगणी येथील या विभागाची कर्मचारी वसाहत शेवटच्या घटका मोजत आहे तर केळझर येथील वसाहत मोडकळीस आली आहे. साध्या पाट दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना कार्यालयात गेल्यावर अधिकारी सापडत नाहीत, तर त्या विश्रामगृहावर कोण राहणा, असा प्रश्न आहे.

लोकप्रतिनिधींना जाग येणार केव्हा?-    बोरधारण परिसरात येणाऱ्यांना बसण्याची व्यवस्था देखील नाही. असे पर्यटनस्थळ शोधून सापडणार नाही. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने याकडे दुर्लक्ष होत असेल तर ती इमारत तालुक्यातील पत्रकारांसाठी देऊन त्या विश्रामगृहाला पत्रकार भवन असे नाव द्यावे, अशी मागणी  पत्रकारांकडून करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Bor Damबोर धरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प