लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या आश्वासनाचा विसर पडला असून शेतमालाचे चुकारे सुध्दा वेळेत मिळत नाही. सरकारच्या धोरणामुळे गेल्या साडेचार वर्षात शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. भाजपा सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी असून फक्त उद्योगपतींचे चोचले पुरविण्यात धन्यता मानणारे आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष अॅड. चारुलता टोकस यांनी व्यक्त केले.समुद्रपूर तालुका कॉँग्रेस कमेटीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.पुढे बोलताना त्यांनी पक्षाच्या बळकटी करीता एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, हिंगणघाट नगर परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ कापसे, नगर परिषद पुलगावचे माजी अध्यक्ष मनीष साहू, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शेख शब्बीर पठाण, महिला कॉँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष हेमलता मेघे, मेहेरबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष शफात अहमद पटेल, आनंद थुटे, सुरेश डांगरी, सुभाष कडू, डॉ. रामकृष्ण खुजे, मुरलीधर पर्बत, गोविंद बाभूळकर, तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष विनोद हिवंज, संध्या डांगरी,शेखर तेलतुंबडे, लक्ष्मण कांबळे, वसंत महाजन, भोयर यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमादरम्यान जाम जिल्हा परिषद सर्कलमधील धुम्मनखेडा, बर्फा व समुद्रपूर शहरातील ४० तरुणांनी कॉँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यात अमोल सायंकार, दशरथ झाडे, ऋषभ राजुरकर, सुरज ठाकरे, अरुण हटवार, आशिष झाडे, सुरज आत्राम, जगदीश वाटे, नंदू गिरोले, हेमंत गिरोले, चेतन मदने, परेश दाते यांच्यासह अनेकांचा सहभाग आहे.प्रवेश घेणाºया तरुणांचे अॅड. चारुलता टोकस यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल महंतारे, प्रास्ताविक परेश बाभुळकर तर आभार विनोद हिवंज यांनी मानले.
उद्योगपतींचे चोचले पुरविणारे सरकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:23 IST
केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या आश्वासनाचा विसर पडला असून शेतमालाचे चुकारे सुध्दा वेळेत मिळत नाही. सरकारच्या धोरणामुळे गेल्या साडेचार वर्षात शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.
उद्योगपतींचे चोचले पुरविणारे सरकार
ठळक मुद्देचारुलता टोकस : ४० तरुणांचा कॉँग्रेसमध्ये प्रवेश