शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

‘त्या’ शासन आदेशाची आर्वीत केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:16 IST

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)ची तालुक्याची सभा आर्वी येथे घेण्यात आली. या सभेदरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाचा अंगणवाडी केंद्रात २५ मुले असावी अन्यथा अंगणवाडी केंद्र बंद करण्याच्या निर्णयाच्या आदेशाची होळी करून आपला निषेध नोंदविला.

ठळक मुद्देआयटकचे आंदोलन : निर्णय मागे घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)ची तालुक्याची सभा आर्वी येथे घेण्यात आली. या सभेदरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाचा अंगणवाडी केंद्रात २५ मुले असावी अन्यथा अंगणवाडी केंद्र बंद करण्याच्या निर्णयाच्या आदेशाची होळी करून आपला निषेध नोंदविला. हे आंदोलन मंगला इंगोले यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले.अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले जात असून ६ वर्ष वयोगटापर्यंतच्या मुला-मुलींना शिक्षणाचे धडे दिले जातात. शहरांमध्ये कॉन्व्हेंटचे क्रेझ वाढत असले तरी गावागावात अजूनही अंगणवाडीचे महत्त्व कायम आहे. सध्याच्या शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे ग्रामीण भागातील अंगणवाड्यांवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. अशातच सरकारचा सदर निर्णय अंगणवाडी कर्मचाºयांच्या जीवावर उठल्याचा आरोप करीत तो तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक ठरणारा १६ जुलैला काढलेल्या शासन निर्णय जाळून अंगणवाडी कर्मचाºयांनी आपला रोष व्यक्त केला.या आंदोलनात मैना उईके, विजया पावडे, वंदना कोळणकर, ज्योती कुलकर्णी, सुषमा कवाडे, आशा चतुर, अरुणा राठोड, ममता देशकर, ज्योती गूजराम, राजेश इंगोले, विश्रांती डेंगरे, प्रमीला मनोहर, मालती आवटे, सुनंदा खडसे, अनिता भगत, रुषाली बोकडे, सुलभा तिरभाने, मिना ढोके यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.आश्वासनाची पूर्तता केव्हा ?निवडणुकीच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विविध आश्वासने देण्यात आली होती. परंतु, त्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही करण्यात आली नाही. शिवाय अंगणवाडी केंद्रांचे खाजगीकरण करण्याची धमकीच दिली जात आहे. केंद्र सरकारने २०११ नंतर एक रुपया मानधनात वाढ केलेली नाही. केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ३५० रुपये प्रतीदिन वेतनासह पीएफ व ईऐसआय देण्याची घोषणा केली होती. परंतु, अजूनही तसा शासन आदेश निर्गमित करण्यात आला नाही. निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

टॅग्स :Governmentसरकार