शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शेतकरी विकासासाठी शासन कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 21:52 IST

महात्मा गांधीचा जिल्हा म्हणून वर्धेची ओळख आणखी दृढ करण्यासाठी राज्य शासन वर्धेच्या विकासासाठी विशेष लक्ष देत आहे.

ठळक मुद्देसदाशिव खोत : प्रजासत्ताक दिनी विविध व्यक्तींचा सत्कार व ध्वजारोहण

आॅनलाईन लोकमतवर्धा : महात्मा गांधीचा जिल्हा म्हणून वर्धेची ओळख आणखी दृढ करण्यासाठी राज्य शासन वर्धेच्या विकासासाठी विशेष लक्ष देत आहे. जिल्ह्यात पायाभूत विकासासोबतच शेतकरी, शेतमजूर, महिला, दिव्यांग अशा सर्व घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन, पणन व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी केले.भारतीय प्रजासत्ताकाचा ६८ व्या वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण ना. सदाशिव खोत यांच्या हस्ते झाले. जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रभारी जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शाहा, स्वातंत्र्य संग्राम सैनिक तसेच अधिकारी उपस्थित होते.यावेळी ना. खोत यांनी सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि शहीदांना विनम्र अभिवादन केले. गृह विभाग, गृहरक्षक, एन.सी.सी., स्काऊट गाईड पथकांनी पथसंचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली. तसेच सामान्य रुग्णालयातर्फे शेतकरी मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रेरणा प्रकल्प सादर करणारी उत्तम झाँकी, आपात कालीन वैद्यकीय सेवा, आरोग्य विभागाच्या योजनाची माहिती देणारा चित्ररथ, बेटी बचाव बेटी पढाओ, पर्यावरण जागृती, दंगल नियंत्रण, वज्र अशा विविध चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.पुढे बोलताना ना. खोत म्हणाले, हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर व भूगर्भातील पाणीसाठ्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना गत काही वर्षांपासून दुष्काळ व नापिकीचा वारंवार सामना करावा लागत आहे. शेतकºयांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापरासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवन हा हवामान अनुकूल कृषी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील १२५ गावांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.शेतकºयांच्या वहीवाटीसाठी असणारे पांदन रस्ते अतिक्रमणामुळे अरूंद झाले आहेत. याचा त्रास शेतकºयांना होत असल्यामुळे राज्य शासनाने पालकमंत्री पांदणमुक्त रस्ता योजना सुरू केली. जिल्ह्यात वार्षिक योजना, लोकवर्गणी आणि कंपनी सामाजिक दायित्व निधीतून ही योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ५७ किलोमीटरचे रस्ते अतिक्रमणमुक्त करून त्यांचे रूंदीकरण व सपाटीकरण करण्यात आले आहे. पावसाळ्यापुर्वी जूनपर्यंत ३०० कि़मी.चे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून या योजनेचा शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ घेत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दहा शहीदांच्या कुटुंबियांना तसेच सेवानिवृत्त जवानांच्या आर्थिकदृष्ट्या परिस्थिती खालावलेल्या वारसांना प्रतिकुटुंब २५ हजार रुपये रोटरी क्लबच्या वतीने सानुग्रह अनुदान राशी देण्यात आली. परेड संचालनामध्ये उत्कृष्ट परेडचा पुरस्कार वाहतूक पोलीस दलास तसेच उत्कृष्ट चित्ररथाचे पारितोषिक जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चित्ररथाला देण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे पारितोषिक सुद्धा मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाला अधिकारी, शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिक उपस्थितीत होते.यांचा झाला सत्कारसंत तुकाराम वनग्राम योजनेमध्ये लादगड येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला ५१ हजार रूपयांचा प्रथम, तावी येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला ३१ हजार रूपयाचा द्वितीय तर मुबारकपूर वन व्यवस्थापन समितीस ११ हजार रूपयाचा तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत २०१५ व २०१६ वर्षांचे उद्योजक पुरस्कार वितरीत करण्यात आले. यामध्ये मे. गुरू इंडस्ट्रीज, मे. पॉवर कॉन्झर्वेशन अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट सेंटर, मे. आशावरी इंडस्ट्रीज, मे श्रीराम अ‍ॅग्रो प्रॉडक्टस यांना ना. सदाशिव खोत त्यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आले.भारतीय वायु सेनेमध्ये भूदल प्रशिक्षक पदावर असलेल्या राकेश देविदास काळे याने भारतीय वायु सेनेतर्फे आयोजित मिशन ७ समिट मध्ये अंटार्टीका खंडातील सर्वात उंच शिखर माऊंट विन्सन पदाक्रांत केले. यासाठी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ध्वज निधी संकलनासाठी प्रभारी जिल्हाधिकारी संजय दैने यांना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. मैत्री ताकसांडे स्केटींग, गोपाल तडस, शितल पाल ज्युदो, संभाजी भुसनर, मदन चावरे कुस्ती, जानराव लोणकर, जाई नखाते या क्रीडापटूंना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.