ऑनलाईन लोकमतवर्धा : शहरातील इतवारा परिसरातून चार चाकी वाहनामध्ये बोकड पळविण्यात आला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी बकरी चोरास अटक केली असून वाहन व मोबाईल असा ३.२२ लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.विक्की रमेश गायकवाड (२८) हा स्वत:च्या मालकीचे बकऱ्या व बोकड इतवारा बाजार परिसरातील मच्छी मार्केट जवळील मैदानात चारत होता. दरम्यान, अज्ञात आरोपीने चार चाकी वाहनातून काळ्या रंगाचा बोकड किंमत १५ हजार रुपये वाहनात टाकून चोरून नेला. तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मंगळवारी रात्री शहरात पेट्रोलिंग करीत असताना फार्मसी कॉलेजजवळ एक वाहन संशयीतरित्या अंधारात उभे दिसून आले. वाहनाजवळ जाताच त्यातील तीन इसम पोलीस पाहून पळू लागले. यामुळे पाठलाग करीत जावेद उर्फ सोनू जुल्फेकार अन्सारी (२८) रा. टेका नाका नागपूर याला पकडण्यात आले. वाहनाची पाहणी केली असता चोरी गेलेला काळ्या रंगाचा बोकड आढळला. यावरून कार व मोबाईल असा ३ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस, एसडीपीओ माधव पडिले, ठाणेदार चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात शहर गुन्हे अन्वेषणचे दत्तात्रय ठोंबरे, सचिन इंगोले, सचिन धुर्वे, संजय पटले, विशाल बंगाले, दिनेश राठोड यांनी केली.
३.२२ लाखाच्या मुद्देमालासह बकरीचोर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:16 IST
शहरातील इतवारा परिसरातून चार चाकी वाहनामध्ये बोकड पळविण्यात आला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी बकरी चोरास अटक केली असून वाहन व मोबाईल असा ३.२२ लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
३.२२ लाखाच्या मुद्देमालासह बकरीचोर गजाआड
ठळक मुद्देवर्धा शहर गुन्हे शोध पथकाची कारवाई