शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम आहार, आरोग्यदायी कुटुंबासाठी ‘माझी पोषण परसबाग’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:34 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने कृतीसंगम प्रकल्पांतर्गत ‘माझी पोषण परसबाग’ मोहीम सुरु करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा पुढाकारआठ हजार बागेचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महिलेच्या गर्भधारणा ते बाळाच्या २ वर्षादरम्यान एकूण १ हजार दिवसाच्या कालावधीमध्ये पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये विषमुक्त, ताजा आणि पोषक तत्त्वांनी युक्त भाजीपाला नियमित येणे आवश्यक आहे. त्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने कृतीसंगम प्रकल्पांतर्गत ‘माझी पोषण परसबाग’ मोहीम सुरु करण्यात आली आहे.

उमेद अभियानाअंतर्गत स्थापित स्वयं सहाय्यता समुहांमधील सदस्यांच्या पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुदृढ राहावी, यासाठी समुहांच्या कुटुंब स्तरावर वैयक्तिक पोषण परसबागेच्या विकसनाचे महत्त्वाकांक्षी कार्य उमेद अभियानाअंतर्गत सुरु आहे. २०२०-२१ मध्ये सुद्धा समूह स्तरावर वैयक्तिक आणि सामूहिक पोषण परसबागेच्या विकसनाचे कार्य सुरु असून याकरिता २५ जून ते १५ जुलै या कालावधीमध्ये ‘माझी पोषण परसबाग’ मोहीम राबविली जात आहे. यावर्षी जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये ८ हजार पेक्षा अधिक वैयक्तिक व सामुदायिक आरोग्यदायी पोषण परसबाग बनविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सत्यजीत बडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे व अमोल पाटील यांची यंत्रणा कार्यरत आहे.

अभियानांतर्गत यासाठी होतेय कार्यगरोदर स्त्रिया, स्तनदा माता आणि त्यांच्या बालकांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जातो.जीवन चक्राच्या योग्य वेळी, योग्य व्यक्तीने योग्य कृती अंमलात आणावी. तसेच गरोदरपणातील आणि स्तनदा अवस्थेतील स्त्रीचे पोषण, मुलभूत स्तनपान आणि पूरक पोषक आहाराच्या पद्धती, आजारी आणि कुपोषित बालकाच्या पोषणाची काळजी, अ‍ॅनिमिया (रक्तक्षय), जीवनसत्व-अ आणि आयोडीनच्या कमतरतेवर नियंत्रण आदी मुद्यांवर लक्ष पुरविले जात आहे. वैयक्तिक स्वच्छता, हात धुण्याची पद्धती व सवय आणि शौचालय, स्वयंपाक घराशेजारी स्वच्छ पाण्याच्या स्त्रोताची उपलब्धता तसेच उच्च दर्जाचे जैविक पद्धतीने पिकवलेल्या पोषणयुक्त भाज्या गरोदर महिला व स्तनदा माता आणि ६ ते २४ महिन्यातील बालकाच्या आहारामध्ये आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

टॅग्स :Healthआरोग्य