शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘देवी’ अवतरताच वर्धेकर आले धावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 23:48 IST

ए... ओऽऽओ ए...भूर भूर भूर भूर हे गाणं ऐकताच आपल्याला नव्यानेच प्रदर्शित झालेल्या ‘नाळ’ या मराठी चित्रपटाची आठवण येते. या चित्रपटातील चिमुकल्या कलाकारांनी सर्वांनाच भुरळ घातली आहे.

ठळक मुद्देसांस्कृतिक, सामाजिक व व्यापारी संघटनेने केले स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ए... ओऽऽओ ए...भूर भूर भूर भूर हे गाणं ऐकताच आपल्याला नव्यानेच प्रदर्शित झालेल्या ‘नाळ’ या मराठी चित्रपटाची आठवण येते. या चित्रपटातील चिमुकल्या कलाकारांनी सर्वांनाच भुरळ घातली आहे. या चित्रपटातील ‘देवी’ एका कार्यक्रमाकरिता वर्ध्यात आली होती. ती आल्याचे कळताच वर्धेकरांनी तिला भेटण्यासाठी गर्दी केली होती. तिचे स्वागत यावेळी वर्धेतील गणमान्य व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले.‘नाळ’ या मराठी चित्रपटात ‘देवी’ ची भूमिका साकारणारी अमरावती येथील ९ वर्षाची चिमुकली मैथिली श्याम ठाकरे ही वर्ध्यातील श्रीराम गव्हाणे यांच्याकडील कार्यक्रमाला आली होती. इतक्या लहान वयात चित्रपटात काम करुन सर्वांच्या मनात घर करणारी बाल अभिनेत्री वर्ध्यात आल्याचे कळताच शहरातील वर्धा कला महोत्सव समिती, संग्राम युथ फाऊंडेशन, तुळजाई सामाजिक संघटना, व्यापारी संघटना यांच्यासह विविध सांस्कृतिक, सामाजिक व व्यापारी संघटनांनी भेट घेऊन स्वागत केले.दोन दिवस वडीलांसह मुक्कामी असलेल्या मैथिलीने वर्ध्यातील चिमुकल्या मित्रमैत्रिंनीसोबतचही संवाद साधला. तिचा हा पहिलाच चित्रपट असून इतक्या कमी वयात रसिकांच्या मनात घर केल्याने साऱ्यांन्याच तिचा लळा लागला. तिला प्रत्यक्ष बघण्याची इच्छा वर्धेकरांनी या दोन दिवसात पूर्ण केली.महिनाभर घरापासून होती लांबमैथिली ठाकरे ही तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत असून नाळ या चित्रपटाकरिता दोन वर्षापूर्वी झालेल्या आॅडिशनमध्ये पात्र ठरली होती. अंगी असलेल्या कलागुणांच्या आधारे तिने मराठी चित्रपटात स्थान मिळविले. या चित्रपटाची शुटींग दोन वर्षापासून सुरु करण्यात आल्याने याकरिता ती वडिलांसोबत महिनाभर घरापासून लांब होती. हा पहिलाच चित्रपट असून खूप काही शिकायला मिळाले, यातून प्रेरणा घेऊ न प्रेक्षकांच्या आशीर्वादाने पुढील वाटचाल करणार असल्याचे तिने यावेळी बोलून दाखविले.