शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

तीन टक्के द्या अन् कार्यारंभ आदेश घ्या; मिनीमंत्रालयात चाललं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 12:27 IST

प्रभारावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेत येथील निविदा शाखेतील २ कर्मचाऱ्यांनी चांगलाच उधम केला आहे. ‘३ टक्के द्या अन् कार्यारंभ आदेश घ्या’ असा अलिखित नियमच काढल्याने अनेक कंत्राटदारांची मुस्कटदाबी झाली आहे.

ठळक मुद्देलिपिकांचा अलिखित नियम : बांधकाम विभागातील प्रकार

आनंद इंगोले

वर्धा : जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा कारभार म्हणजे ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’, असा झाला आहे. आतापर्यंत प्रभारावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेत येथील निविदा शाखेतील दोन कर्मचाऱ्यांनी चांगलाच उधम केला आहे. ‘तीन टक्के द्या अन् कार्यारंभ आदेश घ्या’ असा अलिखित नियमच काढल्याने अनेक कंत्राटदारांची मुस्कटदाबी झाली आहे. या संदर्भात तक्रारी झाल्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतही येथील भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच गाजला. या विभागाचे सभापतीही चुप्पी साधून असल्याने त्यांची या विभागातील कारभाराला संमती तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ग्रामीण भागाच्या विकासकामांकरिता जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालयाची भूमिका बजावतात. यामध्ये बांधकाम विभागाचे मोठे योगदान असते. या विभागामार्फत इमारत, रस्ते, नाल्या व पूल, आदी कामे केली जातात. या कामांकरिता विविध शीर्षकाखाली निधी प्राप्त होतो. त्यामधून १५ लाखांपर्यंतची कामे ग्रामपंचायतीला आणि त्यापेक्षा अधिक रकमेची कामे सोसायट्या आणि खुल्या गटात निविदा प्रक्रियेद्वारे केली जातात. या कामांचा करारनामा करण्याकरिता कंत्राटदारांकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता केली जाते. हे सर्व कागदपत्र निविदा शाखेतील लिपिकांकडे सादर केली जातात.

येथेच कंत्राटदारांना मनस्ताप देण्याचा कार्यक्रम सुरू होत असल्याची ओरड होत आहे. येथील कर्मचारी कंत्राटदारांना चक्क तीन टक्क्यांची मागणी करीत असल्याचे सांगितले जात आहे. तत्काळ निविदा करायची असेल तर आमचे दोन टक्के आणि साहेबांचा एक टक्का, असे तीन टक्के रक्कम देण्याची उजळ माथ्याने मागणी करतात. ही मागणी पूर्णत्वास गेली नाही तर कंत्राटदाराच्या नशिबी येरझरा येतात. यामुळेच अनेक कामांचे करारनामे प्रलंबित आहे.

कंत्राटदारांनी पैसे दिल्यानंतरही करारनामा केला जात नाही. प्रस्तावातील काही कागदपत्रे गहाळ केली जाते. त्यात कुठे खाडाखोड केली जाते, तर काही कपाटामध्ये दडवून ठेवली जाते, असा हुकुमशाही प्रकार सध्या बांधकाम विभागातील निविदा शाखेत असल्याचे कंत्राटदारांकडून सांगितले जात आहे. हा सर्व प्रकार सभागृहात चव्हाट्यावर आणल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. पण, आता कारवाईकरिता पुढाकार घेतला जाईल का? हा खरा प्रश्न आहे.

सहा महिन्यानंतरही कार्यारंभ आदेश नाही

बांधकाम विभागातील निविदा शाखेतील कर्मचाऱ्यांच्या मागणीची पूर्तता न करणाऱ्या कंत्राटदारांना अद्यापही कामांचा कार्यारंभ आदेश दिला गेला नाही. काही कामांच्या निविदा होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला; परंतु तीन टक्के दिले नसल्याने आदेश मिळाला नसल्याची आपबीती कंत्राटदारांनी बोलून दाखविली. या कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे विभागाचे परिणामी जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होत असल्याने या दोन्ही कर्मचाऱ्यांची तत्काळ बदली करण्याची मागणी कंत्राटदारांनी केली आहे.

कार्यकारी अभियंता लक्ष देणार का?

जिल्हा परिषदेला गेल्या एक ते दीड वर्षांपासून नियमित कार्यकारी अभियंता नव्हते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी हम करे सो कायदा, असा प्रकार चालविला. पूर्वी प्रभारी कार्यकारी अभियंता म्हणून सुनील कुंभे यांनी पदभार सांभाळला. त्यांची बदली झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बुब यांनी कामकाज पाहिले. आता नियमित कार्यकारी अभियंता म्हणून विवेक पेंढे सुरू झाले आहे. ते रुजू होताच बांधकाम विभागाच्या निविदा शाखेतील भ्रष्टाचार सभागृहात गाजला. त्यामुळे ते या सर्व गैर प्रकाराला आळा घालणार की कर्मचाऱ्यांना पाठबळ देणार हे येणारा काळच सांगेल.

अनेक समस्या पादांक्रांत केल्यानंतर व वारंवार येरझरा मारल्यानंतर कंत्राटदारांना जिल्हा परिषदेमध्ये कार्यारंभ आदेश मिळतो. यामध्ये मानसिक व आर्थिक खच्चीकरण होत आहे. निविदा शाखेमधील लिपिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढणार असून, त्या मंत्रालयापर्यंत पोहोचविणार. येथील दोन्ही लिपिकांना तत्काळ निलंबित करण्यासंदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार.

किशोर मिटकरी, अध्यक्ष वर्धा जिल्हा कंत्राटदार संघटना.

टॅग्स :zpजिल्हा परिषदCorruptionभ्रष्टाचारpwdसार्वजनिक बांधकाम विभाग