शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम आश्रमाला वारसास्थळाचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:52 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने जागतिक आकर्षणाचे केंद्र ठरले. तसेच जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणारे ऐतिहासिक स्थळ आहे. आज १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून जगभरात साजरा केला जात असून महात्म्य जपण्याकरिता सेवाग्राम आश्रमाचा समावेश जागतिक वारसास्थळात करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली आहे.

ठळक मुद्देजागतिक वारसादिन विशेष : बहार नेचर फाऊंडेशनची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने जागतिक आकर्षणाचे केंद्र ठरले. तसेच जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणारे ऐतिहासिक स्थळ आहे. आज १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून जगभरात साजरा केला जात असून महात्म्य जपण्याकरिता सेवाग्राम आश्रमाचा समावेश जागतिक वारसास्थळात करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली आहे.महात्मा गांधींनी १९३४ मध्ये सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली व त्यानंतर हा आश्रम भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे केंद्रस्थान झाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळ व्यापक करणाऱ्या अनेक घडामोडी या आश्रमात घडल्या. पायाभूत शिक्षणासह पर्यावरणपूरक जीवनशैलीला अनुरूप अनेक विधायक उपक्रम महात्मा गांधींनी येथे राबविले. आज अवघे विश्व हिंसेच्या शक्यतेने भयग्रस्त झाले असून मानवी लालसेपायी निसर्गही धोक्यात आला आहे. अशा विपरित परिस्थितीत गांधींच्या विचारांची साºया जगाला आज नितांत गरज आहे. हा विचार अवघ्या जगाला आपल्या कृतीने आणि प्रयोगांनी समजावून सांगणारी सेवाग्राम आश्रम ही एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमी असून त्याचे शाश्वत मूल्य लक्षात घेऊन या स्थळाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल करण्यात यावा, यासाठी बहार नेचर फाउंडेशनच्यावतीने केंद्र सरकारशी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. युनेस्कोकडून १९७२ मध्ये घेतलेल्या ठरावानुसार सांस्कृतिक अथवा नैसर्गिक वारसास्थळांचा समावेश या यादीत केल्या जातो. जागतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थानांतर्गत प्राचीन वास्तू, ऐतिहासिक ठिकाणे, जंगल, उद्यान, सरोवर आदींचा समावेश त्यात करण्यात येतो.भारतातील ३७ स्थळांचा समावेश आतापर्यंत या यादीत करण्यात आलेला आहे. वारसा स्थळाचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच पुढील पिढ्यांपर्यंत हा अमूल्य वारसा सुपूर्द करणे हा उद्देश वारसास्थळ घोषित करण्यामागे आहे. सेवाग्राम आश्रमाचा समावेश जागतिक वारसा स्थळात करण्यासाठीची शिफारस भारत सरकारने युनेस्कोकडे करावी व तसा प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, सचिव दिलीप विरखडे, संजय इंगळे तिगावकर, अतुल शर्मा, राहुल तेलरांधे, जयंत सबाने, वैभव देशमुख, दीपक गुढेकर, राहुल वकारे, अविनाश भोळे, राजदीप राठोड, सुनंदा वानखडे यांनी केली आहे.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटीSewagramसेवाग्राम