शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये मदत द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 16:02 IST

कृषी विभागाला सूचना : ई-पीक पाहणी अट रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : राज्यातील खरीप हंगाम २०२३ मध्ये सोयाबीन व कापूस पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजारांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. मात्र, ई-पीक पाहणीची अट टाकल्याने शेतकरी योजनेतून वंचित राहत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आमदार दादाराव केचे यांनी सरसकट मदत देण्याची मागणी केली. आता सरकारने अट रद्द करून सरसकट अर्थसहाय्य देण्याचा शासन निर्णय निर्गमित केला.

कापूस व सोयाबीन पिकांमध्ये विदर्भाचा मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे सोयाबीन व कापसाच्या कमी भावामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. त्यांना दिलासा देण्यासाठी आमदार केचे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. मात्र, मदतीसाठी ई पीक नोंदणीची अट घालण्यात आली होती. आता २०२३ मधील शेतकऱ्यांना पाच हजारांचे अर्थसहाय्य देण्यासाठी ई- पीक नोंदणीची अट रद्द करण्यात आली आहे. तसे आदेश राज्य सरकारने काढले. त्यामुळे आर्वी मतदारसंघातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आमदारांनी सरसकट पाच हजारांचे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना देण्याची सूचना केली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सुप्रिया वायवाळ, मंडळ अधिकारी रवींद्र उघाडे, मंडळ अधिकारी दिनेश सावळे, कारंजा तालुका कृषी अधिकारी रमेश वाघमारे यांच्यासह आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील कृषी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :farmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र