शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

घोराड येथे पूर्णवेळ तलाठी द्या

By admin | Updated: June 25, 2014 23:55 IST

सहा हजार लोकसंख्या असलेल्या व सहा मौज्याचा समावेश असताना घोराड येथील तलाठी प्रभारी असल्याने नागरिकांची कमे होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे येथे पूर्णवेळ तलाठी द्यावा अशी मागणी

घोराड : सहा हजार लोकसंख्या असलेल्या व सहा मौज्याचा समावेश असताना घोराड येथील तलाठी प्रभारी असल्याने नागरिकांची कमे होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे येथे पूर्णवेळ तलाठी द्यावा अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांद्वारे केली हात आहे.गत सहा महिन्याअगोदर येथील तलाठी बडे यांची बदली झाली त्यानंतर क्षीरसमुद्र येथील तलाठी घुले यांच्याकडे या कार्यालयाचा प्रभार देण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात ठरविलेल्या दिवसाला तलाठी कार्यालयात कामकाज होत असताना आता जुनगड येथील तलाठी पावडे यांचेकडे घोराड तलाठी कार्यालयाचा प्रभार देण्यात आला आहे. पण काही दिवसांपासून हे कार्यालय कुलूपबंद असल्याने विविध प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या विद्यार्थी, पालक व शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.घोराड तलाठी कार्यालयांतर्गत बिबी, रिंगणी, डोरली, जरवाळा, घोराड या मौजाचा समावेश आहे. सातत्याने विविध कामासाठी येणाऱ्यांची गर्दी येथे राहत असते. या गावाला प्रभारी तलाठी असल्याने जूनगड साझा सुद्धा व्यापक आहे. येथील कार्यालय उघडण्याच्या दिवसालाही बंद राहत असल्याने या कार्यालयाला पूर्णवेळ तलाठी देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.त्याचप्रमाणे गत १५ दिवसांपासून सपूर्ण तालुक्यातील तलाठी विविधा या तहसील कार्यालयाच्या इमारतीत सात बारा, आठ(अ) संगणकीकरण व आॅनलाईन करण्याच्या कामात असल्याने तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थ्यांना आपल्या कामासाठी सेलूला यावे लागत आहे. या इमारतीत असणारी अपुरी व्यवस्था पाहता प्रमाणपत्र देताना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सध्यातरी विविधा हे तालुक्याचे तलाठी कार्यालय बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.(वार्ताहर)