शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना द्या बियाणे निवडीचे स्वातंत्र्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 21:23 IST

राज्यात जनुकीय, जैविक संशोधित बियाण्यांवर पर्यावरण कायदा, बियाणे कायदा व जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत बंदी घातल्याने शेतात संशोधित जैविक, जनुकीय तंत्रज्ञान येणे थांबले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात कोणते बियाणे वापरायचे हा अधिकार आहे. त्यामुळे ही बंदी उठवून शेतकऱ्यांना बियाणे निवडीचे स्वातंत्र द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली

ठळक मुद्देपालकमंत्र्यांंना निवेदन : शेतकरी संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राज्यात जनुकीय, जैविक संशोधित बियाण्यांवर पर्यावरण कायदा, बियाणे कायदा व जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत बंदी घातल्याने शेतात संशोधित जैविक, जनुकीय तंत्रज्ञान येणे थांबले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात कोणते बियाणे वापरायचे हा अधिकार आहे. त्यामुळे ही बंदी उठवून शेतकऱ्यांना बियाणे निवडीचे स्वातंत्र द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.ना. सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्ध्यात आले होते तेव्हा त्यांना निवेदन देण्यात आले. तसेच आ. डॉ. पंकज भोयर व आ. समीर कुणावार यांच्या निवासस्थानी जाऊन शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. तसेच खा. रामदास तडस यांनाही दौऱ्यादरम्यान निवेदन देण्यात आले.राज्यातील कर्जदार शेतकऱ्यांना जून २०१७ च्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या शासन निर्णयाने पिक विमा काढणे बंधनकारक केले आहे. कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातून बँका हप्त्याची कपात करुन कोट्यवधी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घालत आहे. मागील ३ वर्षात बोंडअळी व दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनाने हेक्टरी अनुदान दिले पण; मोजक्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला.बँकांनी शेतकºयांकडून वसुल केलेली रक्कम विमा कंपनीला दिल्याने शेतकऱ्यांवरील तेवढेच कर्ज वाढले. त्यामुळे शासनाने विम्याकरिता केलेली सक्ती उठवावी. त्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार शेतकऱ्यांना द्यावा, अशीही मागणी केली आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे मधुसूदन हरण, जिल्हा प्रमुख उल्हास कोंटबकर, गणेश मुटे, मुकेश धाडवे, प्रभाकर झाडे, सुनिल हिवसे, अभिजीत लाखे, मोरेश्वर वाघमारे, साहेबराव धोटे, शांताराम भालेराव, अरविंद बोरकर, खुशालराव हिवरकर, रोहीत हरणे, सौरभ हिवसे, अथर्व भोयर, पियुष ठाकरे, विजय धोटे, अभी चांदूरकर, गौरव भोयर, प्रियांशू फरकाडे, प्रज्ज्वल ठाकरे आदींची उपस्थिती होती.