लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कापसाला १२ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी आलोडी भागातून शेतकरी स्वातंत्र्य क्रांती कृती समितीच्या नेतृत्वात मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकºयांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.बी. टी. बियाण्यांच्या निर्मितीला सध्या १५ वर्षे पूर्ण झाले आहे; पण त्यात कुठल्याही प्रकारची नवीन जिन्स टाकून नवे वाण निर्मितीची कार्य करण्यासाठी सरकारने आदेश दिले नाही. शिवाय बीज उत्पादन करणाºया कंपन्यांनीही ते केले नाही. नवीन वाण निर्मितीची आणि त्यासंदर्भातील टेस्टींग तसेच मार्केटींगची जबाबदारी सरकार आणि बिज उत्पादन करणाºया कंपन्यांची असते. ते सरकार व बिज उत्पादन कंपन्यांनी केले नसल्याने यंदा कापसाच्या उत्पादनात कमालीची घट येत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, कापूस उत्पादक शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकºयांना दिलासा देण्यासाठी कापसाला प्रती क्विंटल १२ हजार रुपये हमी भाव देण्यात यावा. तसेच शेतकºयांच्या हितार्थ असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. बोंडअळीने नुकसान केलेल्या नुकसानग्रस्त शेतकºयांना एकरी १५ हजार शासकीय मदतीच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्त्व किशोर किनकर यांनी केले. मोर्चात प्रदीप लाऊत्रे, अजय वानखेडे, शरदचंद्र कांबळे, गजानन माऊस्कर, वैभव काळे, सुरज गोह, राजेश धोटे यांच्यासह शेतकरी व शेतकरी स्वातंत्र्य क्रांती कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.
कापसाला १२ हजार रुपये हमीभाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:19 IST
कापसाला १२ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी आलोडी भागातून शेतकरी स्वातंत्र्य क्रांती कृती समितीच्या नेतृत्वात मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
कापसाला १२ हजार रुपये हमीभाव द्या
ठळक मुद्देशेतकरी स्वातंत्र्य क्रांती कृती समितीची मागणी