शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
2
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
3
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
4
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
5
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
6
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
8
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
9
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
10
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
11
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
12
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
13
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
14
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
15
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
16
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
17
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
18
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
19
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
20
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या

By admin | Updated: August 17, 2016 00:53 IST

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावे यासह मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लहुजी शक्ती ...

मागणी : लहुजी शक्ती सेनेचा मोर्चा वर्धा : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावे यासह मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले. शिवाजी चौकातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी निवेदनात मातंग समाजाला अ, ब, क, ड आरक्षण देण्यात यावे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची पुनर्रचना करून नियमित सुरू करावे. लहूजी साळवे अभ्यास आयोगाच्या सर्व अटी मान्य कराव्या. पोलीस बॅन्ड पथकातील पूर्ण जागा मातंग समाजासाठी राखीव कराव्या. प्रत्येक शासकीय ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात दायीन ही पूर्वीप्रमाणे पद निर्माण करून ते मातंग समाजाच्या महिलेकरिता राखीव करावे. मातंग समाजाच्या ५० वर्षांखालील वृद्ध कलावंतास शासनाकडून पेन्शन देण्यात यावी. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व गुरू लहूजी साळवे यांची जयंती महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांत साजरी करण्याचे आदेश द्यावे. राज्यातील सर्व शासकीय वाचनालयांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे. जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यालयासमोर लहूजी साळवे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारावे. अनुसूचित जातीतील सर्व घटकांची सर्वागिण विकास व प्रगती होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्याकरिता राज्य शासनाच्या समाजकल्याण खाते, कृषी पशू संवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स व्यवसाय विभाग, फलोत्पदान विभाग व इतर खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनंत बिहार राज्याप्रमाणेच अ,ब,क,ड नुसार वर्गवारी करून अनु. जातीतील उपेक्षित मातंग समाजाला व इतर जातींना सामाजिक न्याय देण्यात यावा. राज्याच्या वार्षिक अंदाजपत्रकात अनु. जाती योजनेकरिता असलेल्या आर्थिक तरतुदीचे जातीनिहाय वाटप करावे, आदी मागण्या लावून धरण्यात आल्या. निवेदन देताना विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. रूपेश खडसे, जिल्हाध्यक्ष संग्राम कळणे, अमरावती जिल्हाध्यक्ष पंकज जाधव, सरचिटणीस मंगेश प्रधान, सुनील संतापे, गौरी वाघमारे, रमेश भिसे, सतीश पिठे, किशोर बावणे, सुधाकर लांडगे, विनय इंगळे, अनिल पोटफोडे, रंजीत वानखेडे, प्रमोद ससाने, कृष्णा तायवाडे, ईशांत खंडार उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)