लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : नजीकच्या कडाजना शिवारातील गोल्हर जिनिंग अॅण्ड ऑइल प्रायव्हेट लिमिटेडच्या ३० हजार चौरस फुटातील टिन शेड शनिवारी रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कोसळले. यात जवळपास १ कोटी ३ लाख रुपयांचे नुकसान झाले.शनिवारी रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पावसाने एक तास थैमान घातले. यात गोल्हर जिंनिंगचे सुमारे तीस हजार चौरस फुटांचे टिन शेड कोसळले तसेच इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळाचा जोर एवढा प्रचंड होता की शेडचे अनेक लोखंडी अँगल वाकून शेड जमीनदोस्त झाले. तसेच अनेक टिनपत्रे उडून शेजारच्या शेतात पडले. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.घटनेविषयी सकाळी सहा वाजता गोल्हर जिंनिंगचे संचालक धनराज गोल्हर यांनी संबंधित विभागाला माहिती कळविली. तलाठी भोंग यांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला. यात तीन हजार चौरस फुटांवरील सुमारे ७५ टक्के शेड नुकसानग्रस्त होऊन १ कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच हॉपर, कवडी क्लीनर सहित ५ लाख, वीज उपकरणे २ लाख व फायर पाइप १० हजार असे एकूण १ कोटी ६ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले. विजेच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसामुळे काही काळाकरिता परिसरातील वीजपुरवठा खंडित होता. वादळवाºयामुळे मात्र, कुठलीही जीवहानी झाली नाही.आर्वी परिसरात विजेचा लपंडावदेउरवाडा/आर्वी - तालुक्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार वाºयामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित झाला. शनिवारी रात्री व पहाटे वाऱ्यासह हलक्या स्वरुपात पावसाच्या सरी आल्याने परिसरातील विद्युत पुरवठा काही काळाकरिता खंडित झाला होता. पाऊस झाल्याने वातावरणात उकाडा निर्माण झाला. लहान मुले व वयोवृद्ध यांना उकाड्याने हैराण केले. जोरदार वाºयामुळे आर्वी शहरातील पथदिवेही बंद झाले होते. वादळाने शिरपूर परिसरातील काही झाडे पडली तर अनेक अस्थायी दुकानांचे छत उडून गेले होते. नगरपालिका आणि वीज महावितरणचे कर्मचारी रविवारी सकाळी पथदिव्यांची दुरुस्ती करण्यासह वीजपुरवठा सुरळीत करण्याकरिता युद्धपातळीवर काम करीत होते. या वादळीवाऱ्यामुळे कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही.मांडगावात नागरिकांना अंधारातच काढावी लागली रात्रशनिवारी रात्री मांडगाव शिवारात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन मेघगर्जनेसह दोन ते अडीच तास जोरदार पाऊस झाला. विजांचा कडकडाट, वादळीवाऱ्यामुळे वीज वाहिन्यात बिघाड निर्माण होत रात्री १०.३० ला विद्युत पुरवठा खंडित झाला. संपूर्ण गावकऱ्यांनी व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी संपूर्ण रात्र अंधारात काढली. वीज वितरणचे अधिकारी, कर्मचारी दुरूस्तीच्या कामी लागले असून तारेवरची कसरत करीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा रविवारी प्रयत्न करीत होते. जवळपास १७ तास होऊनही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने गावकºयांना पाणी समस्येसोबतच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
वादळाने जिनिंगचे १.०६ कोटी रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST
घटनेविषयी सकाळी सहा वाजता गोल्हर जिंनिंगचे संचालक धनराज गोल्हर यांनी संबंधित विभागाला माहिती कळविली. तलाठी भोंग यांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला. यात तीन हजार चौरस फुटांवरील सुमारे ७५ टक्के शेड नुकसानग्रस्त होऊन १ कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच हॉपर, कवडी क्लीनर सहित ५ लाख, वीज उपकरणे २ लाख व फायर पाइप १० हजार असे एकूण १ कोटी ६ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले.
वादळाने जिनिंगचे १.०६ कोटी रुपयांचे नुकसान
ठळक मुद्देशेडसह साहित्याची मोडतोड : जिल्ह्याला तिसऱ्यांदा वादळाचा तडाखा